News Flash

“देशभक्त मुस्लीम भाजपालाच मत देणार, पाकिस्तानी समर्थक मात्र संकोच करतील”, भाजपा नेत्याचं वक्तव्य

"आपल्या मतदारसंघाच ५० हजाराहून जास्त मुस्लीम मतदार असून आपण आजपर्यंत कधीही त्यांच्याकडे मतं मागण्यासाठी गेलो नाही"

देशभक्त मुस्लीम भाजपाला मतदान करतील, पण पाकिस्तानी समर्थक मात्र भाजपाला मतदान करताना संकोच करतील असं वक्तव्य कर्नाटकमधील भाजपा नेते ईश्वरप्पा यांनी केलं आहे. ईश्वरप्पा ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आहेत. याआधी लोकसभा निवडणुकीआधी ईश्वरप्पा यांनी भाजपाकडून मुस्लिमांना निवडणूक तिकीट दिलं जाणार नाही असं म्हटलं होतं. गाईंच्या कत्तलीवर बंदी आणणारा कायदा लवकरच आणण्यात येईल असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं आहे.

“अखंड भारत व्हावा ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण असं होत नाहीये कारण त्यांना (काही ठराविक राजकीय नेत्यांना) मुस्लिमांची मतं मिळणार नाही अशी भीती सतावत आहे. भाजपा सत्तेत येण्याआधी आपण काँग्रेसच्या काही आमदारांना भेटलो होतो ज्यांना भाजपात येण्याची इच्छा होती. पण त्यांचा दावा होता की, त्यांच्या विधानसभा मतदारसंघात ५० हजाराहून जास्त मुस्लिम मत असून आपल्याला त्यांना मुकावं लागेल. जर ती मतं मिळाली नाही तर आपल्याला पराभवाचा सामना करावा लागेल असं त्यांचं म्हणणं होतं,” असं ईश्वरप्पा यांनी यावेळी सांगितलं.

आपल्या मतदारसंघाच ५० हजाराहून जास्त मुस्लीम मतदार असून आपण आजपर्यंत कधीही त्यांच्याकडे मतं मागण्यासाठी गेलो नसल्याचा दावा यावेळी ईश्वरप्पा यांनी केला. “मी काँग्रेस आमदारांना माझ्या मतदारसंघात आठ ते १० हजार मतदार असून, ५० हजाराहून अधिक मुस्लीम मतदार असल्याचं सांगितलं. मी आजपर्यंत एकदाही मुस्लीम मतदारासमोर जाऊन हात जोडले नाहीत. मी ४७ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला,” असं ईश्वरप्पा यांनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, “एक देशभक्त मुस्लीम भाजपाला मत देईल आणि जो पाकिस्तानी समर्थक आणि देशद्रोही असेल तो भाजपाला मत देताना संकोच करेल”. लोकसभा निवडणुकीआधी ईश्वरप्पा यांनी भाजपा मुस्लिमांना निवडणूक तिकीट देणार नाही कारण त्यांचा पक्षावर विश्वास नाही असं वक्तव्य केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 4:36 pm

Web Title: karnataka minister ks eshwarappa muslim voters bengaluru sgy 87
Next Stories
1 आंध्र प्रदेशचे माजी विधानसभा अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांची आत्महत्या
2 लग्न झालेल्या महिला लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलांपेक्षा आनंदी – आरएसएस
3 ‘गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण’, शोभा डे यांनी उडवली निर्मला सीतारामन यांची खिल्ली
Just Now!
X