News Flash

‘जिवंत असेपर्यंत सोडणार नाही’, भाजपा आमदाराच्या घरी एक्स गर्लफ्रेंडचा राडा

भाजपा आमदाराच्या निकटवर्तियांनी महिला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला आहे

कर्नाटकमधील भाजपा आमदार एसए रामदास सध्या चर्चेत आले आहेत. यामागे कोणतंही राजकीय कारण नसून त्यांच्या घराबाहेर एका महिलेने गोंधळ घातल्याने त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. या महिलेने आपण त्यांची माजी प्रेयसी असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी महिलेने त्यांच्या घराबाहेर तुफान राडा घातला. याच ठिकाणी एसए रामदास यांचं कार्यालयही आहे. एसए रामदास हे म्हैसूरमधील कृष्णाराजा मतदारसंघातील आमदार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचं नाव प्रेमकुमारी असं आहे. गुरुवारी सकाळी रामदास यांना भेटायचं असल्याचं सांगत त्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. जेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी रामदास येथे उपस्थित नसल्याचं सांगितलं तेव्हा महिलेने आरडाओरड करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमकुमारी सकाळी ८.३० वाजता आमदार रामदास यांच्या घरी पोहोचल्या होत्या. जेव्हा कर्मचाऱ्यांनी ते उपस्थित नसल्याचं सांगितलं तेव्हा तिने त्यांचा अपमान करण्यास सुरुवात केली. ‘मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना सोडणार नाही. मीदेखील एका चांगल्या कुटुंबातून आहे. मी त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर असलेल्या प्रेमामुळेच मी निवडणुकीतून माघार घेतली होती. मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते माझा कॉल घेत नाहीत’, असं प्रेमकुमारी यावेळी बोलल्या.

विधानसभा निवडणुकीआधी प्रेमकुमारी यांनी रामदास यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची धमकी दिल्यानंतर त्यांचं हे प्रेमप्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. पण नंतर त्यांनी माघार घेत आपल्याला रामदास यांनी ५ कोटी रुपये दिल्याचा दावा केला होता. दरम्यान रामदास यांच्या निकटवर्तियांनी महिला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला आहे. आपण लग्न केलं असल्याचं ती म्हणत असली, तरी तिच्याकडे कोणताही पुरावा नाही. पैसे मिळवण्यासाठी ते हे सगळं करत आहे असा आरोप करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2018 2:16 pm

Web Title: karnataka mla sa ramdas ex girlfriend premkumari create ruckus
Next Stories
1 काश्मीरमध्ये चार वर्षांत ६६० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा: भाजपा
2 ‘त्या’ जॅकेटवरून मेलानिया ठरल्या टिकेच्या धनी अन् मदतीला धावून आले ‘धनी’
3 मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रभारी, मोहनप्रकाश यांची उचलबांगडी
Just Now!
X