News Flash

काळाने साधला डाव! ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा तडफडून मृत्यू

कर्नाटकात मृत्यूचं तांडव... कोविड रुग्णांचा समोवश

वृत्त कळताच मृतांच्या कुटुंबियांनी रुग्णालयाच्या पायऱ्यांवरच हंबरडा फोडला. (छायाचित्र।एएनआय)

ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून दररोज ओरडत होत असून, देशात कुठे न् कुठे रुग्णांना प्राणास मुकावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत. आंध्र प्रदेशातही दिरंगाईमुळे मृत्यूचं तांडव बघायला मिळालं. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास विलंब झाल्याने आंध्र प्रदेशातील चमराजनगर जिल्ह्यात २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. मरण पावलेल्या रुग्णांमध्ये करोनाबाधित रुग्णांचाही समावेश आहे.

कर्नाटकातील चमराजनगर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. बल्लारी येथून रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा येणार होता. मात्र, ऑक्सिजन येण्यास विलंब होत असल्याने आपतकालीन ऑक्सिजनसाठी जिल्हा रुग्णालयातून मध्यरात्री २५० ऑक्सिजन सिलेंडर मैसूरला पाठवण्यात आले होते. मात्र, वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात न आल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यात करोनाबाधित रुग्णही आहेत.

आणखी वाचा- आई जगावी म्हणून मुली तोंडाने श्वास देत होत्या; रुग्णालयातील ‘तो’ क्षण पाहून सगळेच हळहळले

चमराजनगर रुग्णालयात जे काही झालं ते दुर्दैवी आहे. या घटनेबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मी मैसूर, मंड्या आणि चमराजनगरला जात आहे. चमराजनगरमध्ये रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची चौकशी केली जाईल. त्याचबरोबर रुग्णालयाला सामोऱ्या जाव्या लागत असलेल्या इतर समस्यांचीही माहिती घेऊ,” असं कर्नाटकाचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “मृत्यू की हत्या?” कर्नाटक दुर्घटनेवर राहुल गांधीची संतप्त प्रतिक्रिया

‘करोना रुग्णांसह एकूण २४ उपचाराधीन रुग्णांचा ऑक्सिजन तुटवडा आणि इतर कारणांमुळे चमराजनगर जिल्हा रुग्णलायात २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्ही सध्या मृत्यूच्या अहवालाची प्रतिक्षा करत आहोत,’ असं जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश कुमार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी चमराजनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर या घटनेची दखल घेऊन उद्या मंत्रिमंडळाची बैठकही बोलावली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:50 pm

Web Title: karnataka oxygen shortage 24 patients covid positive died chamarajanagar district hospital bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दिल्लीत आजपासून तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाला सुरुवात
2 माध्यमांना थांबवू शकत नाही; निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाचा झटका
3 शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरेंसह १३ नेत्यांनी ३५,००० कोटींकडे वेधलं केंद्राचं लक्ष
Just Now!
X