News Flash

शेतकरी आंदोलन : कंगनाविरोधात कर्नाटकमध्ये FIR दाखल

कर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना कथितरित्या निशाणा बनवून केलेल्या ट्विटसाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतविरोधात कर्नाटक पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील एका न्यायालयानं कंगनाविरोधात FIR दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी पोलिसांनी केली आहे.

अवश्य पाहा – “बॉलिवूडचं गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास काय?”; याचिका दाखल करणाऱ्यांवर कंगना संतापली

कृषी विषयक विधेयकांवरून काही शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला ट्विटच्या माध्यमातून कंगनाने आपला विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर वकील रमेश नाईक यांनी प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्या न्यालायात कंगना विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावरणी दरम्यान न्यायालयानं क्याथासंगरा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षकांना कंगनाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

काय म्हणाली होती कंगना?

“कोणी झोपलं असेल तर त्याला जाग केलं जाऊ शकतं, ज्याला गैरसमज असेल त्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र जे झोपण्याचं सोंग करत आहेत, न समजल्याचं नाटक करत आहेत. त्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहे CAA मुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही मात्र त्यांनी रक्ताचे पाट वाहून टाकले. अशा शब्दांमध्ये ट्विट करत कंगना रणौतने या विधेयकांचा विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 3:53 pm

Web Title: karnataka police fir kangana ranaut anti farmer tweet mppg 94
Next Stories
1 ‘अटल बोगद्या’जवळून सोनिया गांधी यांच्या नावाचा फलक गायब, काँग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा
2 “करोना लशीच्या वितरणाविषयी काम सुरू”; मंत्रिगटाच्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी लशीबद्दल दिली महत्त्वाची माहिती
3 धक्कादायक, नागरी सेवा परीक्षा सुरु असताना कॉलेजच्या आवारात तरुणीवर बलात्कार
Just Now!
X