24 September 2020

News Flash

धक्कादायक, श्री अराकेश्वरा मंदिरातील तीन पुजाऱ्यांची दगडाने ठेचून हत्या

मंदिराचे दरवाडे उघडे होते, म्हणून गावकरी...

श्री अराकेश्वरा मंदिराच्या प्रांगणात शुक्रवारी सकाळी तीन पुजाऱ्यांचे मृतदेह आढळले. त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. कर्नाटकातील मांड्या शहरातील गुट्टालू येथे हे मंदिर आहे. तिन्ही पुजाऱ्यांची ओळख पटवण्यात आली आहे. गणेश, प्रकाश आणि आनंद या तिघांचे मृतदेह रक्तांच्या थारोळयात पडलेले होते. दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली.

मंदिराचे दरवाडे उघडे होते, म्हणून गावकरी आत गेले, त्यावेळी तिन्ही पुजाऱ्यांची हत्या झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मंदिरात दानपेटीत जमा होणारी रक्कम चोरण्याच्या हेतूने ही हत्या झाली. आरोपींनी दानपेटीतून रोख रक्कमेच्या नोटा नेल्या पण नाणी तशीच ठेवली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

तिन्ही मृत पुजारी चुलत बंधू आहेत. मंदिराच्या संपत्तीच्या सुरक्षेसाठी तिघेही प्रांगणातच झोपायचे असे पोलिसांनी सांगितले. तिन्ही पुजाऱ्यांची झोपेत असताना हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे. कारण कोणताही प्रतिकार झाल्याचे पुरावे आढळलेले नाही.

या हत्येमध्ये तीनपेक्षा जास्त आरोपी सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. प्राथमिक तपासात दरोडा हाच हत्येचा उद्देश दिसत आहे. कारण हुंडी मंदिराच्या प्रांगणात पडलेल्या होत्या. त्यातील रोख रक्कम हल्लेखोरांनी काढून नेली. मांड्या पोलीस आरोपींना शोधण्यासाठी श्वानांची मदत घेत आहेत तसेच घटनास्थळावर फॉरेन्सिक तज्ज्ञांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 2:53 pm

Web Title: karnataka three priests found brutally murdered at mandya temple dmp 82
Next Stories
1 अभिनेत्री कंगना रणौतला झेड प्लस सुरक्षा देण्याची भाजपा आमदाराची मागणी
2 “उद्धव ठाकरे हे डमी मुख्यमंत्री, खरा मुख्यमंत्री तर दाऊद इब्राहिम”
3 ‘मार्कशीट मुलांसाठी झालीय प्रेशरशीट मात्र पालकांसाठी ती प्रेस्टीजशीट’ म्हणत मोदींनी दिला ‘5 C’चा मंत्र
Just Now!
X