News Flash

करोनाची लागण झाल्याच्या भीतीपोटी एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

साधा सर्दी, खोकला झाला तरी अनेकांच्या मनता शंकेची पाल चुकचुकत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सध्या संपूर्ण देशात करोना व्हायरसमुळे अत्यंत भितीचे वातावरण आहे. साधा सर्दी, खोकला झाला तरी अनेकांच्या मनता शंकेची पाल चुकचुकत आहे. याच भितीपोटी आपल्याला करोना व्हायरसची लागण झाली आहे या समजातून एका व्यक्तीने आत्महत्या केली. कर्नाटकाच्या उडीपी जिल्ह्यात ही दुर्देवी घटना घडली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

मृत व्यक्ती कर्नाटक राज्य रस्ते परिवहन सेवेमध्ये प्रशिक्षक होता. बुधवारी सकाळी लवकर तो घरातून बाहेर पडला. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या अंगणात झाटाला लटकून त्याने गळाफास घेतला. झाडाजवळ असलेल्या खिडकीमध्ये एक चिठ्ठी सापडली. “आपल्याला करोना व्हायरसची लागण झाल्याची भिती आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या” असे त्याने चिठ्ठीमध्ये लिहिल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

“मृत व्यक्तीमध्ये करोना व्हायरसची कुठलीही लक्षणे दिसली नव्हती तसेच तो कुठल्या उपचारांसाठी डॉक्टरांकडेही जात नव्हता” असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. “हा माणूस सातत्याने करोना व्हायरससंबंधी बातम्या पाहत होता. आपल्याला करोनाची लागण झालीय या भितीने त्याच्या मनामध्ये घर केले होते. त्यामुळे तो निराश झाला होता” असे एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. रविवारपासून तो खूपच घाबरला होता असे मृत व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 11:33 am

Web Title: karnataka udupi man feared he had coronavirus kills himself dmp 82
Next Stories
1 CoronaVirus : व्वा दादा..!! गरीब-गरजुंसाठी गांगुलीकडून ५० लाखांची मदत
2 Coronavirus : स्टेट बँकेत खातं आहे? … तर तुम्हाला घरबसल्या मिळणार ‘ही’ सुविधा
3 Coronavirus : उपजिल्हाधिकारी महिलेने पुढे ढकलले लग्न
Just Now!
X