26 October 2020

News Flash

ऑनर किलिंग: आंतरजातीय प्रेमसंबंधांतून वडिलांनीच पोटच्या मुलीची केली हत्या

हत्या केली आणि तिचा मृतदेह शेतात पुरला...

दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एका तरुणीची तिच्या वडिलांनी आणि दोन चुलत भावांनी मिळून हत्या केली. बंगळुरूपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामगनाग्रा जिल्ह्यात ऑनर किलिंगचे हे प्रकरण समोर आले आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सुरुवातीला तरुणी बेपत्ता असल्याची नोंद केली होती. पण नंतर ऑनर किलिंगची ही घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नऊ ऑक्टोंबरला मुलीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. ती बी. कॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. तक्रार नोंदवल्यानंतर दुसऱ्यादिवशी तक्रारदाराच्या भावाच्या शेतात मुलगी मृतावस्थेत आढळली. “पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी तिघांनी हत्येचे कारस्थान रचले होते. आठ ऑक्टोबरला तिघांनी मिळून मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह शेतात पुरला. दुसऱ्या दिवशी आरोपी असलेल्या मुलीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली” अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सीमंत कुमार सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

“नेमकं काय प्रकरण आहे, तो शोधून काढण्यासाठी पोलिसांनी २१ सदस्यीय पथकाची स्थापना केली होती. १० ऑक्टोबर रोजी मुलीचा मृतदेह सापडला. कुटुंबासमोर मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलीच्या पालकांच्या चेहऱ्यावर कुठलेही दु:खाचे भाव दिसले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी केल्यानंतर हे ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचे समोर आले” रामगनाग्राचे एसपी गिरीश यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 3:14 pm

Web Title: karnataka woman killed by father cousin brothers over inter caste relationship dmp 82
Next Stories
1 भारतात पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस देण्याची योजना, ‘या’ गटांना मिळू शकते पहिले प्राधान्य
2 डीडी नॅशनलवर आजपासून रामलीलाचे अयोध्येतून थेट प्रसारण
3 मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्याय जेडीयूत दाखल
Just Now!
X