News Flash

karnataka election: ..अन् सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांनी सांगितला व्हॉट्स अॅपवरील विनोद

काँग्रेस व जनता दल सेक्यूलर या पक्षाचे आमदारही राज्याबाहेर आहेत, त्यांना यायला वेळ लागेल, असा युक्तिवाद भाजपाची बाजू मांडणारे अॅड. मुकुल रोहतगी यांनी केला.

संग्रहित छायाचित्र

कर्नाटकमध्ये शनिवारी बहुमत चाचणी घ्यावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुमारे तासाभराच्या सुनावणीनंतर हा निर्णय देण्यात आला. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टात न्या. ए के सिक्री यांनी व्हॉट्स अॅपवर व्हायरल झालेला जोक सांगताच काही काळासाठी न्यायालयातील तणाव कमी झाला.

कर्नाटकमधील सत्तासंघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला असून काँग्रेसने राज्यपाल वजूभाई वाला यांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले आणि गुरुवारी सकाळी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. याविरोधात काँग्रेस व जनता दल सेक्यूलर पक्षाने याचिका दाखल केल्या आहेत.

काँग्रेसच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान भाजपाच्या वतीने बहुमत चाचणी सोमवारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेस व जनता दल सेक्यूलर या पक्षाचे आमदारही राज्याबाहेर आहेत, त्यांना यायला वेळ लागेल, असा युक्तिवाद भाजपाची बाजू मांडणारे अॅड. मुकुल रोहतगी यांनी केला. यावर न्या. सिक्री यांनी व्हॉट्स अॅपवरील विनोदाचा दाखला दिला. ईगलटोन रिसोर्टचा मालकही सत्तास्थापनेचा दावा करतो. त्याच्याकडे ११७ आमदारांचे संख्याबळ आहे, असे त्यांनी सांगितले. आमदारांमुळे त्या रिसोर्टमालकाला आणि कर्मचाऱ्यांना तिथे प्रवेश करणे कठीण झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले. यानंतर खंडपीठाने भाजपाची मागणी फेटाळून लावली आणि शनिवारीच बहुमत चाचणी घ्यावी, असे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाकडे सर्वांचेच लक्ष असले तरी त्या विनोदामुळे काही काळ तणाव काही अंशी कमी झाली हे मात्र नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 12:29 pm

Web Title: karnataka yeddyurappas supreme court test justice sikri eagleton resort owner whatsapp joke
Next Stories
1 पदभार स्वीकारताच येडियुरप्पांनी पोलीस खात्यात केले महत्वाचे फेरबदल
2 येडियुरप्पांचा फैसला उद्या; कर्नाटक विधानसभेत शनिवारी बहुमत चाचणी घ्या: सुप्रीम कोर्ट
3 मोदींच्या कृपेने राज्यपाल झालेले वजुभाई न्यायपालिकेच्या तत्वाला जागले नाहीत – शिवसेना
Just Now!
X