29 September 2020

News Flash

कर्नाटक: आणखी पाच आमदारांची सुप्रीम कोर्टात धाव, अविश्वास प्रस्तावासाठी येडियुरप्पा तयार

अविश्वास प्रस्तावावरुन भाजपाही काळजीत असल्याचे दिसते कारण त्यासाठी त्यांनी आपल्याही आमदारांना हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये पाठवून दिले आहे.

संग्रहित छायाचित्र

कर्नाटकाच्या राजकारणात अद्यापही खळबळ सुरुच आहे. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी परवानगी मागितली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बंडखोर आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, राजीनामा दिलेल्यांपैकी आणखी पाच आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा अविश्वास प्रस्तावासाठी तयार आहेत.

काँग्रेसचे वरीष्ठ नेते आणि बंडखोर आमदार आनंद सिंह आणि रोशन बेग यांच्यासह पाच आमदारांनी आपले राजीनामे न स्विकारल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी आणि कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना मंगळवारपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला होता.

दुसरीकडे काँग्रेसचे बंडखोर आमदार एमटीबी नागराज हे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. तत्पूर्वी त्यांनी काँग्रेसचे संकटमोचक डी. शिवकुमार यांच्याशी चर्चा केली होती. शिवकुमार यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी म्हटले होते की, त्यांना राजीनामा मागे घेण्याची आग्रही विनंती करण्यात आली आहे. त्यानंतर आता सुधाकरराव यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण राजीनामा मागे घेण्याबाबत विचार करु असे म्हटले आहे.

अविश्वास ठरावासाठी तयार : येडियुरप्पा

कर्नाटकातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांचे म्हणणे आहे की, पक्षाला अविश्वास प्रस्तावाबाबत कोणतीही अडचण नाही. मात्र, त्यासाठी आम्ही सोमवारपर्यंत वाट पाहू त्यानंतर विधानसभेत अविश्वास प्रस्तावाचा सामना करु. अविश्वास प्रस्तावावरुन भाजपाही काळजीत असल्याचे दिसते कारण त्यासाठी त्यांनी आपल्याही आमदारांना हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये पाठवून दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 4:23 pm

Web Title: karnatka crisis five more mlas riched at sc yeddiyurappa ready for non confidence motion aau 85
Next Stories
1 पोलिसही मॉब लिंचिंगचे बळी; मायावतींचा आरोप
2 वेतन कपातीच्या मार्गावर काँग्रेस; लोकसभेतील पराभवानंतर आर्थिक चणचण
3 15 ऑक्टोबरपूर्वी कामं पूर्ण करा; केंद्राची अधिकाऱ्यांना डेडलाइन
Just Now!
X