माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र तामिळनाडूतील खासदार कार्ति चिदंबरम यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. ते करोना पॉझिटिव्ह असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांनी ट्विटद्वारे आपल्याला करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे.
माझी करोना टेस्ट नुकतीच पॉझिटिव्ह आली आहे. माझ्यात सौम्य लक्षण आहेत आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार मी होम क्वारंटाइन झालो आहे. अशातच माझ्या संपर्कात जे कोणी आले असतील त्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी देखील स्वतःची तपासणी करून घ्यावी व वैद्यकीय सुचनांचे पालन करावे. असे कार्ति चिदंबरम यांनी ट्विट केले आहे.
I have just tested positive for #Covid. My symptoms are mild and as per medical advice I am under home quarantine. I would urge all those who have recently been in contact with me to follow medical protocol.
— Karti P Chidambaram (@KartiPC) August 3, 2020
कार्ति चिदंबरम हे तामिळनाडूमधील शिवगंगा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार व अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य देखील आहेत.
आणखी वाचा- मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यापाठोपाठ त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण
या अगोदर तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहीत हे देखील करोना पॉझिटिव्ह आढळले असून, त्यांना राजभवनातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष देत आहे.
आणखी वाचा- एकाच दिवसात पाच भाजपा नेते करोना पॉझिटिव्ह
कालच उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमल वरूण यांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यापाठोपाठ देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देखील करोना पॉझिटिव्ह आढळले. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यानंतर त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले.
आणखी वाचा- देशातील १८ लाखांहून अधिक करोनाबाधितांपैकी ११ लाख ८६ हजार २०३ जण करोनामुक्त
जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. अगदी गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वसामान्य माणसापासून ते व्हीआयपी व्यक्ती देखील करोनाच्या कचाट्यात सापडत असल्याचे यावरून दिसत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 1:35 pm