News Flash

काश्मीर हे काश्मीरी जनतेचेच, ना भारताचे ना पाकिस्तानचे – आफ्रिदी

शाहीद आफ्रिदी याने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरबाबत वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरबाबत वक्तव्य केलं आहे. ‘काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा, काश्मीर हे काश्मीरी जनतेचेच आहे.’ असा दावा आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात केला आहे.

अफ्रिदीने आपल्या आत्मचरित्र्यात म्हटलेय की, ‘काश्मीर काश्मीरी जनतेचे आहे, ना भारती ना पाकिस्तान. प्रथम आणि अखेरचं सत्य हेच आहे की काश्मीर काश्मीरी जनतेचे आहे. ‘इम्रान खान यांनी काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी आणखी प्रयत्न करायला हवेत असेही यामध्ये म्हटले आहे. पंतप्रधानाबद्दल वक्तव्य करने सोपं आहे. मात्र, त्यांच्यासारखे काम करने कठीण आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीचे आत्मचरित्र ‘गेम चेंजर’ नुकतेच प्रकाशित झाले. यामध्ये अनेक महत्वाच्या विषयावर वक्तव्य करण्यात आले आहेत. ‘गेम चेंजर’ला आफ्रिदीने पत्रकार वजाहत एस खान यांच्यामदतीने लिहले आहे. तर ‘हार्परकॉलिन्स इंडिया इम्प्रिंट हॉर्पर स्पोर्ट्स’ ने याला प्रकाशित केले आहे. ‘गेम चेंजर’ या आपल्या आत्मकथेत आफ्रिदीने क्रिकेटच्या रंजक कथा, विंग कमांडर अभिनंदन, काश्मीर, भारत-पाक आणि इम्रान खान सरकारवर भाष्य केलं आहे.

काश्मीर मुद्यावर वक्तव्य करत यापूर्वीही आफ्रीदी चर्चेत आला होता. त्यावेळी आफ्रीदी म्हणाला होता की, ‘काश्मीर हा काही मुद्दा नाहीये, पाकिस्तानलाही काश्मीर नकोय…त्यांच्याकडून तर तेथील जनताच सांभाळली जात नाही. काश्मीर भारतालाही देऊ नका… मी म्हणतो काश्मीरला स्वतंत्र राहु द्या… माणुसकी मोठी गोष्ट आहे. ज्या लोकांचा तेथे मृत्यू होतोय…ते कोणत्याही धर्माचे असोत…माणूस म्हणून दुःख होतं…किमान माणुसकी तरी जिवंत राहु द्या’.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 1:22 pm

Web Title: kashmir belongs to kashmiris not india or pakistan says shahid afridi in his autobiography game changer
Next Stories
1 #HappyBirthdayRohit: हिटमॅनच्या नावावर आहेत हे ५० विक्रम
2 IPL 2019 Points Table : प्लेऑफच्या दोन स्थानांसाठी पाच संघात लढाई
3 ‘मी गे नाही!’; सोशल मिडियावरील पोस्टवरुन गोंधळानंतर ‘या’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचे स्पष्टीकरण
Just Now!
X