01 March 2021

News Flash

भाजपच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक

काश्मीरमधील घडामोडींना वेग

(संग्रहित छायाचित्र)

काश्मीरमधील घडामोडींना वेग

काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले असतानाच जम्मू-काश्मीरमधील घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जम्मू-काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना मंगळवारी दिल्लीत तातडीच्या बैठकीसाठी बोलावले आहे. दरम्यान, काश्मीरमधील चार व्यापाऱ्यांवर रविवारी ‘एनआयए’ने छापे घातले.

पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होण्याची शक्यता आहे. सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष हे बैठकीला हजर राहतील. मात्र, बैठकीचे विषय राज्यातील पक्षनेत्यांना कळविण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आले. बैठकीत अनुच्छेद ३५ अ संदर्भात किंवा विधानसभेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकांबाबत चर्चा होणार असेल, अशी शक्यता पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने वर्तवली. तथापि, या बैठकीला हजर राहणार असलेल्या पक्षाच्या दुसऱ्या एका नेत्याने अनुच्छेद ३५ अ वर चर्चा होण्याची शक्यता नाकारली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित असताना आम्ही त्याबाबत विचार कशाला करू? आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करू, असे हा नेता म्हणाला.

केंद्रीय निमलष्करी दलाचे अतिरिक्त दहा हजार जवान काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३५ अ आणि अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत का, अशी शंका तेथील नेते उपस्थित करू लागले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 1:27 am

Web Title: kashmir conflict bjp mpg 94
Next Stories
1 ‘मिनी माऊस’चा आवाज हरपला
2 अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची करण्याचा मार्ग उत्तरेतून
3 काश्मीर हा संघर्षबिंदू असल्याची जाणीव करून देण्यात यश
Just Now!
X