27 February 2021

News Flash

काश्मीर भारताचा होता, भारतातच राहिल; उलमा-ए-हिंदने पाकिस्तानला ठणकावले

काश्मीरप्रश्नी भारतीय मुस्लिमांना उकसवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न जमीयत उलमा-ए-हिंद या भारतातील विद्वान मुस्लिमांच्या संघटनेने हाणून पाडला आहे.

महमूद मदानी, जमीयत उलमा-ए-हिंद

काश्मीरमधून ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून भारतीय मुस्लिमांना उकसवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतातील विद्वान मुस्लिमांची संघटना जमीयत उलमा-ए-हिंदने हाणून पाडला आहे. तसेच काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय असल्याचे पाकला ठणकावले आहे.

काश्मीरप्रश्नी पाकिस्तान खोटं पसरवण्याचा उद्योग करीत असल्याचे उलमा-ए-हिंदचे पदाधिकारी महमूद मदनी यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, “काश्मीर आमचा होता, आमचा आहे आणि आमचाच राहिल. भारताच्या बाजूने आम्ही आहोत. त्यामुळे काश्मीर हा आमचा अंतर्गत विषय असून काश्मिरींच्या शंका दूर करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांची आहे. आम्ही काश्मीर मुद्द्यावर भारताच्या सोबत आहोत.”

“आम्हाला विश्वास आहे की, काश्मीर खोऱ्यातील स्थिती सामान्य होण्याकरीता सरकार आवश्यक पावले उचलत आहे. तसेच जे काश्मिरी लोक आपली संस्कृतीक ओळख सुरक्षित ठेऊ इच्छित आहेत सरकारने त्यांचा आवाजही ऐकायला हवा,” असेही मदनी यांनी म्हटले आहे.

मदनी म्हणाले, “काश्मीरप्रश्नी भारतीय मुसलमान भारताच्या विरोधात आहेत, असे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मंचांवर दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानच्या या विचारांची आम्ही निंदा करतो. आमच्या संघटनेने आज एक ठराव पारित केला असून यामध्ये काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले आहे. आम्ही आपल्या देशाची सुरक्षा आणि अखंडतेसोबत कोणतीही तडजोड करणार नाही. भारत आमचा देश आहे आणि आम्ही या देशासोबत उभे आहोत,” असेही या ठरावात म्हटल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 2:51 pm

Web Title: kashmir hamara tha hamara rahega jamiat ulema e hind told to pakistan aau 85
Next Stories
1 बहुमताचा अत्यंत धोकादायक पद्धतीने गैरवापर होतोय; सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका
2 कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा दूतावासाची मदत देण्यास पाकिस्तानचा नकार
3 चांद्रयान-2 : इस्रोला मिळाली नासाची साथ; विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी पाठवला संदेश
Just Now!
X