News Flash

जवानांनी एका दहशतवाद्याला घातले कंठस्नान, काश्मीरच्या शोपियनमध्ये चकमक

मोलू-चित्रगाम भागात सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा पथकांनी एक दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.

जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यातील मोलू-चित्रगाम भागात सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा पथकांनी एक दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरु आहे. शोपियन जिल्ह्यातच ३१ मे रोजी झालेल्या चकमकी दोन दहशतवादी ठार झाले होते तर एक जवान जखमी झाला होता.

घटनास्थळावरुन मोठया प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. झैनापोरा भागातील द्रागड गावात शोध मोहीम सुरु असताना ही चकमक झाली होती. त्याआधी ३० मे रोजी सोपोरच्या दानगरपोरा भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

दोनगरपोरा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी या भागात शोध मोहिम सुरु केल्यानंतर ही चकमक सुरु झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 8:29 am

Web Title: kashmir shopian district molu chitragam area one terrorist killed
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सियाचेनमध्ये
3 सरकारपुढे अन्नधान्य महागाईचे आव्हान!
Just Now!
X