काश्मीर खोऱ्यात परत पाठवण्यापूर्वी विश्वासात घेतले जावे व खोऱ्यातून आमच्या पलायनास कारणीभूत ठरलेल्या वंशहत्येची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी काश्मिरी पंडितांनी निदर्शनांच्या वेळी केली.
काश्मिरी पंडितांच्या कुटुंबीयांनी जंतरमंतर येथे निदर्शने केली, त्या वेळी जम्मू-काश्मीर सरकारने काश्मिरी पंडितांच्या हत्येबाबतचे खटले पुन्हा सुरू करावेत अशी मागणी निदर्शकांनी केली.  त्यांनी हुरियत कॉन्फरन्स व फुटीरतावादी नेत्यांविरोधात घोषणा देत अटकेची मागणी केली. कलम ३७० रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जम्मू-काश्मीर विचार मंचचे मनोज भान यांनी सांगितले, की केंद्राने जो काही निर्णय होईल, त्यात काश्मिरी पंडितांना विश्वासात घ्यावे. विभाजनवादी नेत्यांना काश्मिरी पंडितांच्या बाबतीत निर्णयात हस्तक्षेप करू देऊ नये.