कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणाने सगळा देश हादरला. आता या प्रकरणातील पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढल्याचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या प्रकरणातील नराधमांना शिक्षा देण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जातो आहे. दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबने या संदर्भातला अहवाल दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील फॉरेन्सिक लॅबमध्ये १४ पाकिटे तपासली. त्यात त्यांना पीडित मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आढळलेल्या वीर्याचे अंश हे आरोपीशी जुळत असल्याचे समजले आहे. मृत पीडितेचा व्हिसेरा आणि आरोपींच्या रक्ताचे नमुने एकमेकांशी जुळवण्यात आले ते जुळत असल्याचेही समोर आले आहे. बलात्कार झालेल्या पीडित मुलीच्या अंगावर असलेली सलवार आणि फ्रॉक यावर लागलेली माती, रक्ताचे डाग हे देखील तपासण्यात आले. हे डाग १ ते २१ मार्च या कालावधीतले आहेत असेही दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबने म्हटले आहे.

पोलिसांनी ज्या नराधमांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत त्यांच्या डीएनए पीडितेच्या अंगावर सापडलेल्या रक्ताशी, गुप्तांगातील वीर्याशी जुळला आहे. या प्रकरणातला हा मोठा पुरावा मानला जातो आहे. या पुरावाच्या आधारे या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा होण्यास हातभार लागणार आहे. या मुलीच्या दोन केसांचे नमुनेही आम्ही फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते. हे केस आम्हाला मंदिरात सापडले होते. आम्हाला सापडलेल्या दोन केसांपैकी एक पीडित मुलीचा आणि एक आरोपीचा असल्याचे समजले आहे.

या मुलीच्या फ्रॉकवर असलेले डाग डिटर्जंट पावडने धुण्याचा प्रयत्न झाला आहे हे देखील अहावालात समोर आले आहे. मात्र काही रक्ताचे डाग या फ्रॉक आणि सलवारवर राहिले आहेत. जे आरोपींच्या रक्त नमुन्याशी जुळत आहेत.

जम्मू काश्मीरमधील कठुआ या ठिकाणी एका ८ वर्षांच्या मुलीवर सात दिवस बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या सगळ्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले. त्यानंतर आता फॉरेन्सिक अहवालाच्या मदतीने पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा लागला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kathua rape murder case vaginal swabs match with accused says forensic lab
First published on: 21-04-2018 at 12:00 IST