कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अल्माटी विमानतळावर टेक ऑफ घेताना जवळ असलेल्या दोन मजली इमारतीवर हे विमान आदळलं. यावेळी विमानात १०० प्रवासी प्रवास करत होते. यापैकी काही प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. सध्या बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेक ऑफ दरम्यान या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अल्माटीवरून नूर सुल्तान या ठिकाणी जाताना हे विमान अपघातग्रस्त झालं. रॉयटर्सनुसार या विमानात एकूण ९५ प्रवासी आणि ५ क्रू मेंबर्स होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी हा अपघात झाला.

टेक ऑफ दरम्यान वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटला आणि विमान नजिकच्या दोन मजली इमारतीवर जाऊन आदळल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आपात्कालिन सेवा विमानतळावर दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kazakhstan flight crashed emergency services almaty airport jud
First published on: 27-12-2019 at 09:23 IST