दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कलंकित पैसा स्वीकारला आणि जे उमेदवार मतांची खरेदी करण्यास तयार होते त्यांनाच उमेदवारी दिली, असा आरोप आम आदमी पार्टीचे (आप) संस्थापक असलेल्या शांती भूषण यांनी बुधवारी केजरीवाल यांच्यावर केला.
पक्षांतर्गत लोकशाहीच्या सर्व तत्त्वांना केजरीवाल यांनी हरताळ फासला आणि पक्षाला स्वच्छ राजकारणाच्या मार्गावर येण्यास सांगितले. ज्यांनी गैरमार्गाने अमाप संपत्ती गोळा केली आणि ज्यांची दारू आणि पैसा वाटून मते खरेदी करण्याची तयारी होती अशा बहुसंख्य उमेदवारांना केजरीवाल यांनी तिकिटे दिली, असेही शांती भूषण यांनी म्हटले आहे.
दिल्लीत आपला मिळालेल्या विजयाचा आपल्याला आनंद झालेला नाही. कारण आपण केलेल्या आरोपांचा विचार न करताच मतदारांनी मतदान केले. आपण काही उमेदवारांबाबत जे वक्तव्य केले आहे अशा १५-२० कलंकित लोकांना केजरीवाल यांनी मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, असा सल्लाही शांती भूषण यांनी त्यांना दिला