दिल्लीतील ४०० युनिटपर्यंत विजेचा वापर असलेल्या ग्राहकांसाठी वीजदरात ५० टक्के सबसिडी जाहीर करून आम आदमी पार्टीने (आप) आपल्या निवडणुकीतील दुसऱ्या आश्वासनाची पूर्तता केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली.
सबसिडीच्या घोषणेमुळे तिजोरीवर पुढील तीन महिन्यांसाठी ६१ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या सबसिडीचा दिल्लीतील २८ लाख ग्राहकांना लाभ होणार आहे.
वीजदरातील सबसिडीच्या घोषणेपाठोपाठ खासगी क्षेत्रातील तीन वितरण कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांचे ‘कॅग’मार्फत लेखा परीक्षण करण्याचे आदेशही लवकरच देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.