सिंगापूरमध्ये करोनाचा विषाणूचा नवीन प्रकार आला असल्याची खोटी माहिती पसरवल्याबद्दल सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी फेसबुक आणि ट्विटरला यासंदर्भात दुरुस्ती करण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता सिंगापूरमध्ये फेसबुक आणि ट्विटरला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील युजर्सना ही दुरुस्ती करण्यासंदर्भात नोटीस पाठवावी लागणार आहे. याचाच अर्थ अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या विधानासंदर्भातील कोणतीही माहिती फेसबुक आणि ट्विटरवर दिसणार नाही.

सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या माहितीबद्दल सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाला माहिती असल्याचे म्हटले आहे. भारतातील शहरांमध्ये आढळून आलेला करोनाचा विषाणू हा सिंगापूरमधला असल्याचे यातून सांगण्यात आले आहे असे यात म्हटल्यांचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- “केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं मत देशाचं मत नाही”, परराष्ट्रमंत्र्यांनी सुनावलं!

केजरीवाल यांच्या वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर सिंगापूरने बुधवारी भारत सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणावरून समाधान व्यक्त केले. तरीही चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी सिंगापूरने मोठे पाऊल उचलले आहे. सिंगापूर सरकारने अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात अँटी-मिसइन्फरमेशन अॅक्ट अर्थात प्रोटेक्शन फ्रॉम ऑनलाईन फॉल्सहुड अॅण्ड म्यॅनुप्युलेशन अॅक्ट (पीओएफएमए) लागू केला आहे.

आणखी वाचा- मुलांसाठी घातक ठरणारा नवा स्ट्रेन भारतातीलच; केजरीवालांच्या ‘त्या’ ट्विटवर सिंगापूर दूतावासाचं उत्तर

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या कायद्यानुसार सोशल मीडियावरील कंपन्यांना सिंगापूर मधील करोना विषाणूसंदर्भातील खोट्या माहितीबद्दल सर्व युजर्सना स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. फेसबुक आणि ट्विटरला सिंगापूरमध्ये करोनाचा नविन विषाणू नसल्याचे तसेच हा लहान मुलांसाठी धोकादायक नसल्याचे सांगावे लागणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी सिंगापूरमध्ये आढळून आलेला करोना विषाणूमुळे भारतात करोनाची तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे लहान मुलांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो असे म्हटले होते.