JNU चा माजी विद्यार्थी आणि CPI नेता कन्हैय्या कुमार याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यास दिल्ली सरकारने मंजुरी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंबंधीची संमती दिल्ली पोलिसांना दिली आहे. कन्हैय्या कुमार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. या निर्णयामुळे कन्हैय्या कुमारच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात कथित देशविरोधी नारे दिल्याप्रकरणी हा खटला कन्हैय्या कुमार विरोधात चालणार आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला यासंबंधीची संमती देणारी फाईल ही गेल्या काही दिवसांपासून पडून होती. मात्र केजरीवाल सरकारने आता यावर निर्णय घेतला आहे. ज्यामुळे कन्हैय्या कुमारवर देशद्रोहाचा खटला चालणार आहे.

काय आहे प्रकरण?
२०१६ च्या फेब्रुवारी महिन्यात जवाहरलाल नेहरु विद्यापीठ परिसरात काही घोषणाबाजी करणाऱ्यांचे व्हिडीओ समोर आले होते. या घोषणा देशविरोधी होत्या. जेएनयूच्या विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाची फाईल गेल्या काही महिन्यांपासून पडून होती. आता दिल्लीतील केजरीवाल सरकारने कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास संमती दिली आहे. त्यामुळे कन्हैय्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kejriwal government gives permission to delhi police go ahead prosecute kanhaiya kumar in jnu sedition case scj
First published on: 28-02-2020 at 21:02 IST