चारा घोटाळ्यातील दोषी लालूप्रसाद यादव यांची गळाभेट घेऊन केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या स्वप्नाचा विश्वासघात केल्याची टीका आम आदमी पक्षाचे बंडखोर नेते शांति भूषण यांनी केली आहे.
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाने अण्णा हजारे यांन केजरीवलांच्या आम आदमी पक्षाच्या स्थापनेचा पाया घातला होता. अण्णांचा भ्रष्टाचारविरोधाचा मुद्दाच पुढे लावून धरत केजरीवाल राजकारणात स्थिर झाले आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र, हुकुमशाहा पद्धतीने पक्ष चालविणारे केजरीवाल आता पाहिलेली स्वप्न विसरुन गेल्याचा आरोप विरोधक करत आहेत असे म्हणत शांति भूषण यांनी केजरीवाल हे हुकूमशहा असल्याची टीका केली. नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांची गळाभेट घेऊन केजरीवाल यांनी हेच दाखवून दिल्याचा आरोप शांतिभूषण यांनी केला. केजरीवाल ‘आप’ला खाप पंचायतीप्रमाणे चालवत असल्याचा आरोपही देशाचे माजी कायदा मंत्री व आपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या भूषण यांनी केला आहे.
मात्र बिहारचे माजी मुख्यमंत्री असलेल्या लालू यादव यांनी केजरीवाल यांची जबरदस्तीने गळाभेट घेतली व राजकीय शिष्टाचार म्हणून मनात नसतानाही केजरीवाल यांना लालूंना मिठी मारावी लागली, अशी सारवासारव केजरीवालांचे समर्थक करत आहेत.