दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपण हनुमान भक्त असल्याचे पुन्हा एकदा घोषित केले आहे. यावेळी ते म्हणाले की, दिल्लीतील त्यांचे सरकार रामराज्य किंवा रामायणातील १० तत्त्वांचे अनुसरण करते. त्यांनी असेही आश्वासन दिले की एकदा अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर दिल्ली सरकार शहरातील सर्व वयोवृद्ध लोकांना मंदिराच्या दर्शनासाठी नेण्याचा विचार करत आहे.

बुधवारी दिल्ली विधानसभेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांचे सरकार दिल्लीतील जनतेची सेवा करण्यासाठी रामराज्य या संकल्पनेतून प्रेरित होऊन १० तत्त्वांचे अनुसरण करीत आहे.

केजरीवाल म्हणाले, “मी हनुमानाचा भक्त आहे जो रामभक्त होता. तर मी दोघांचा भक्त आहे. भगवान राम अयोध्याचा राजा होता. असे म्हणतात की त्याच्या कारकिर्दीत सर्व काही चांगले होते. कोणीही दु: खी नव्हते. प्रत्येक सुविधा तिथे होती आणि म्हणूनच त्याला रामराज्य असे म्हणतात.”

अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावाच्यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेताना मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, “रामराज्याच्या संकल्पनेतून प्रेरित होऊन दिल्लीत लोकांची सेवा केली पाहिजे.” केजरीवाल पुढे म्हणाले की, रामायणातील दहा तत्त्वे अन्न, शिक्षण, वैद्यकीय सेवा, वीज, पाणीपुरवठा, रोजगार, घरे, महिलांना सुरक्षा आणि ज्येष्ठांचा सन्मान ही आहेत. दिल्लीत कोणालाही रिकाम्या पोटी झोपू लागु नये. केजरीवाल म्हणाले की, सामाजिक प्रतिष्ठेची पर्वा न करता प्रत्येक मुलाने दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे.

मुख्यमंत्री म्हणाले की श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाला शक्य तितक्या उत्तम वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. ते म्हणाले, “आम्ही सरकारी रुग्णालयांची स्थिती सुधारली आहेत आणि या दिशेने काम करताना मोहल्ला दवाखाने देखील सुरू केली आहेत.” त्यांनी दिल्ली विधानसभा सदस्यांना रुग्णालयात जाण्यास, रांगेत उभे राहून सामान्य लोकांप्रमाणे लस घेण्यास सांगितले.