दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना २०१४ च्या एका रॅलीदरम्यान एका रिक्षाचालकाने श्रीमुखात लगावली होती. या घटनेला दोन वर्षे उलटली असून, या घटनेचे अनेक गाण्यासोबत रिमिक्स करून एक व्हिडिओ एका फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. फेसबुकवरील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लाखोंनी व्ह्यूज मिळविणाऱ्या या व्हिडिओला हजारो लोकांनी आत्तापर्यंत शेअर केले. रिक्षाचालकाने केजरीवाल यांच्या श्रीमुखात लगावल्याच्या दृष्याला ए. आर. रेहमान यांच्या ‘वंदे मातरम…’ गाण्यापासून धनुषच्या ‘कोलावरी डी…’ गाण्यासोबत रिमिक्स करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 26, 2016 5:26 pm