13 August 2020

News Flash

जनलोकपाल मंजूर झाले नाही तर राजीनामा देईन – केजरीवाल

विधानसभेत जनलोकपाल संमत झाले नाही तर राजीनामा देण्याचा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. या मुद्दय़ावर कोणत्याही थराला जाऊ,

| February 10, 2014 01:54 am

विधानसभेत जनलोकपाल संमत झाले नाही तर राजीनामा देण्याचा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. या मुद्दय़ावर कोणत्याही थराला जाऊ, असा इशारा यापूर्वीच केजरीवाल यांनी दिला आहे. हे विधेयक संमत झाले नाही तर आपल्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे केजरीवाल यांनी सांगितले. या विधेयकाला दिल्ली सरकारला पाठिंबा देणारा काँग्रेस, त्याचबरोबर भाजपने विरोध केला आहे. देशातील भ्रष्टाचार घालवण्यासाठी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा शंभर वेळा त्याग करू, असे केजरीवाल यांनी स्पष्ट
केले.  ही विधेयके दिल्ली विधानसभेत १३ फेब्रुवारीला मांडली जाणार आहेत. स्थानिक पातळीवर भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्वराज विधेयकात लोकांच्या हाती थेट सत्ता देण्याची तरतूद आहे.केजरीवाल यांची ही धमकी म्हणजे जबाबदारीपासून पळ काढण्याची खेळी असल्याची प्रतिक्रिया दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदसिंग लवली यांनी दिली. सदनात काँग्रेस जनलोकपालला पाठिंबा देईल असे त्यांनी जाहीर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2014 1:54 am

Web Title: kejriwal threatens to quit over jan lokpal bill
Next Stories
1 इशरतला दहशतवादी ठरवण्यामागे ‘आयबी’चे राजिंदर कुमारच!
2 आप सरकारच्या योजनेमुळे पाणी, विजेचा अपव्यय शक्य – पचौरी
3 हल्ला झालेल्या हिंदू कुटुंबीयांना ४.३४ दशलक्ष टका नुकसानभरपाई देण्याचे आदेश
Just Now!
X