News Flash

दिल्लीत शीला दीक्षित यांच्या विरोधात अरविंद केजरीवाल निवडणुक लढणार

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज रविवार आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतून निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केले. दिल्लीतून काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री शीला दीक्षित

| June 2, 2013 04:04 am

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज रविवार आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतून निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केले. दिल्लीतून काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री शीला दीक्षित विधानसभा निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करणार आहेत. तेथूनच अरविंद केजरीवाल निवडणुक लढणार असल्याने शीला दिक्षित आणि अरविंद केजरीवाल यांच्यात  आगामी निवडणुकांमध्ये राजकीय लढत पहावयास मिळेल. भाजपवर सुद्धा केजरीवाल टीका करत म्हणाले, मागील निवडणुकांमध्ये भाजपने दिल्लीतून दीक्षित यांच्या विरोधात कमकुवत उमेदवार उभा केला होता.

 
नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी केजरीवाल कोणत्या ठिकाणाहून निवडणुक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष होते आणि केजरीवालांनी आज आयोजित केलेल्या त्यांच्या पक्षाच्या सभेत त्यांना दिल्लीतून शीला दीक्षित यांच्या विरोधात निवडणूक लढवून आपले नशीब आजमावायचे असल्याचे केजरीवालांनी म्हटले. तसेच “जर शीला दीक्षित यांनी घाबरुन किंवा इतर कोणत्याही कारणास्तव दुसऱ्या मतदार संघातून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतल्यास, मी दीक्षित ज्या मतदार संघातून अर्ज दाखल करतील, त्या मतदार संघातून त्यांच्या विरोधात निवडणुकीला उभा राहीन” असेही केजरीवाल म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 4:04 am

Web Title: kejriwal to contest against sheila dikshit in delhi polls
टॅग : Sheila Dikshit
Next Stories
1 भारतीय वायुसेनेतील लढाऊ विमानांच्या शस्त्रसाठ्यात लवकरच ‘ग्लाईड बॉम्ब’
2 नारायण मुर्तींचे ‘इन्फोसिस’मध्ये पुनरागमन
3 श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासाठी ‘दबावतंत्र’
Just Now!
X