17 January 2021

News Flash

“करोनामुळे २०२० चं शैक्षणिक वर्ष वाया गेलं”; ‘या’ देशात सरकारनेच केली घोषणा, थेट २०२१ मध्ये उघडणार शाळा

सप्टेंबरमध्ये शाळा सुरु करण्याचा होता विचार मात्र...

प्रातिनिधिक फोटो

भारतामध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायची की नाही यासंदर्भात मतभेद असतानाच आफ्रीकेमधील एका देशाने थेट संपूर्ण शैक्षणिक वर्षच वाया गेल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आता या देशातील विद्यार्थ्यांना थेट २०२१ मध्ये जानेवारी महिन्यात शाळेत आणि महाविद्यालयांमध्ये जाता येणार आहे. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आलं आहे.

जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला असून संपूर्ण जग या विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी लढताना दिसत आहे. मागील तीन ते चार महिन्यांमध्ये अनेक देशांनी वेळोवेळी लॉकडाउनचा कालावधी वाढवत नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलं आहे. मात्र असं असतानाच आता काही देशांमध्ये करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तेथील एक एक सेवा हळू हळू सुरु करण्यात आली आहे. मात्र अनेक देशांनी अद्याप शाळांसंदर्भातील निर्णय घेतलेले नाही. मात्र केनिया सरकराने शाळांसदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. यावर्षी करोनाच्या साथीमुळे वर्ग भरवण्यात येणार नसून २०२० हे संपूर्ण शैक्षणिक वर्षच करोनामुळे वाया गेलं असल्याची घोषणा सरकारने केली आहे. यासंदर्भातील वृत्त एपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

नक्की वाचा >> असेही करोना योद्धे… टेडी बेअरही उतरले करोनाविरुद्धच्या लढाईत, त्यांच्या खांद्यावर ‘ही’ जबाबदारी

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे २०२१ पर्यंत केनियामधील सर्व शाळा बंद राहणार आहेत. सर्व शाळा आणि अंतिम वर्षांच्या परिक्षा या जानेवारीनंतरच घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. सामान्यपणे अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये घेतल्या जातात. देशाचे शिक्षण मंत्री जॉर्ज मागोहा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये देशातील करोनाचा वाढता आलेख हा डिसेंबरमध्येच खाली जाणार असल्याचे सांगण्यात येत असल्याचे सरकराने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे २०२० मध्ये देशभरात कोणतेही प्राथमिक, माध्यमिक वर्षांच्या परीक्षा घेतल्या जाणार नाही. हे वर्ष करोनामुळे वाया गेलं असं समजण्यात येईल असंही या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

केनिया सरकराने सप्टेंबर महिन्यामध्ये शाळा पुन्हा सुरु करुन प्राथमिक आणि माध्यम वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं. मात्र सध्या देशामध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाटत असल्याचे सप्टेंबरमध्येही शाळा सुरु करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> देश लहान पण मूर्ती महान… डॉक्टरांच्या सन्मानार्थ उभारला २० फूट उंच पुतळा

केनियामध्ये केवळ तीन करोनाबाधित असतानाच १५ मार्च रोजीच सरकारने देशातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद केल्या होत्या. एएफपीच्या वृत्तानुसार देशाचे राष्ट्रपती उहरु केनियाता यांनी सोमवारीच देशातील सेवा टप्प्या टप्प्यात सुरु करण्याची घोषणा केली. देशामध्ये एक ऑगस्टपासून आंतरराष्ट्रीय विमानांची प्रवासी वाहतूक सुरु केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 2:13 pm

Web Title: kenya declares school year lost classes back in 2021 scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोना काळात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं चुकीचं -राहुल गांधी
2 विकास दुबेच्या एन्काउंटरनंतर योगी आदित्यनाथ चर्चेत
3 विकास दुबेला एन्काऊंटरमध्ये ठार केलं जाऊ शकतं, सुप्रीम कोर्टात आधीच दाखल झाली होती याचिका
Just Now!
X