News Flash

केनिया मॉलवरील हल्ला : दहशतवाद्यांनी वापरलेली गाडी सापडली?

नैरोबीतील मॉलवर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी वापरलेले वाहन तपास अधिकाऱ्यांनी शोधून काढले असल्याचा दावा केनिया सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केला आहे.

| September 28, 2013 12:41 pm

नैरोबीतील मॉलवर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी वापरलेले वाहन तपास अधिकाऱ्यांनी शोधून काढले असल्याचा दावा केनिया सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केला आहे. मॉलवरील हल्ल्यात ६७ जण ठार झाले होते. केनियातील मॉलवर गेल्या शनिवारी दहशतवादी हल्ला करण्यात आला त्या वेळी एका गर्भवती महिलेला बचावासाठी पळून जाण्यास सांगणाऱ्या व्यक्तीची माहितीही मिळविण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.दहशतवाद्यांनी वापरलेल्या गाडीचा मालक कोण आहे, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दहशतवाद्यांनी आणखी काही वाहनांचा वापर केला होता का, त्याबाबतची चौकशीही सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 12:41 pm

Web Title: kenya mall attack terrorists used car found
Next Stories
1 अखिलेश यादव सरकार मुझफ्फरनगर दंगलग्रस्तांना शासकीय नोकऱया देणार!
2 हवामानातील १९५० नंतरचे बदल गेल्या १४०० वर्षांतील सर्वात तीव्र
3 पाकिस्तानला पुन्हा भूकंपाचा धक्का; दिल्लीतही सौम्य झटके!
Just Now!
X