केरळमध्ये काँग्रेस आघाडीकडून डाव्या आघाडीकडे सत्ता येण्याचे चक्र यंदाही पूर्ण झाले आहे. राज्याचे राजकारण या दोन आघाडय़ांभोवतीच केंद्रित झाले आहे. गेली अनेक वर्षे आलटून-पालटून त्यांच्याकडेच सत्ता आहे. मात्र यंदा किमान दोन डझन मतदारसंघांत भाजपने आव्हान उभे केल्याचे चित्र होते. मुळात केरळमध्ये ख्रिश्चन व मुस्लीम मतदार ४० ते ४२ टक्के असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजपच्या राजकारणाला मर्यादा आहेत. ते हेरूनच इळवा या इतर मागास वर्गीयांमधील २३ टक्के असलेल्या जातीच्या माध्यमातून काम करणाऱ्या भारत धर्मजन सेना या पक्षाशी आघाडी केली. मात्र निवडणुकीत त्याला फारसे यश मिळाले नाही. अर्थात केरळ विधानसभेत प्रवेश करण्याचे भाजपचे स्वप्न यंदा पूर्ण झाले. राज्यात भाजपच्या उभारणीत योगदान देणारे ८६ वर्षीय नेते ओ. राजगोपाल यांनी त्रिवेंद्रमजवळील नेमॉम मतदारसंघातून विजय मिळवत खाते उघडले. केरळमध्ये यंदा सत्तांतर अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्री उम्मन चंडी यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवर झालेले आरोप पाहता काँग्रेससाठी सत्ता राखणे आव्हान होते. डाव्या आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने ज्येष्ठ नेते अच्युतानंदन व पिनरयी विजयन यांच्यातील वाद टाळण्याचा प्रयत्न केला. नव्वदी पार केलेल्या अच्युतानंदन यांच्या नावावर डाव्या आघाडीने मते मागितली.
निवडणुकीच्या तोंडावर सौर घोटाळ्याचा मुद्दा गाजला होता. चौकशी आयोगापुढे खुद्द मुख्यमंत्री उम्मन चंडी यांनाच हजर राहावे लागल्याने सत्ताधारी काँग्रेसची कोंडी झाली होती. उमेदवारी वाटपातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुधीरन व चंडी यांच्यात वाद झाला. अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना उमेदवारी नाकारण्याची प्रदेशाध्यक्षांची योजना चंडी यांना मान्य नव्हती. अगदी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे हा वाद गेला होता. थोडक्यात काँग्रेस पक्षात एकजिनसीपणाचा अभाव होता. याचा परिणाम प्रचार मोहिमेवर झाला. दुसरीकडे डावी आघाडी एकत्रितपणे प्रचाराला सामोरी गेली. सत्ताविरोधी लाटेचा फटकाही काँग्रेसला बसला. माकपची आपली पारंपरिक मतपेढी कायम राखल्याने त्यांना मोठे यश मिळाले. माकपने राज्यात सर्वाधिक २६ टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला २३ टक्के मते मिळाली. तर भाजप व त्यांचा मित्रपक्ष भारत धर्मजन सेना पक्षाला अनुक्रमे १० व चार टक्के मते मिळाली.

विजयी मिरवणुकीवर हल्ला; १ ठार
कन्नूर: डाव्या आघाडीच्या विजयी मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्यात एक जण ठार तर आठ जण जखमी झाले. तसेच जिल्ह्य़ात भाजप व माकप समर्थकांमध्ये हाणामारी झाली. संघ व भाजप समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप माकपने केला आहे. ज्या धर्मदन मतदारसंघात ही घटना घडली तेथून माकपचे पॉलीट ब्युरो सदस्य पिनरयी विजयन हे विजयी झाले आहेत.काही ठिकाणी माकप व मुस्लिम लीगच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली.

२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
INDIA bloc parties manifestoes key issues against BJP
काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहारला विशेष दर्जा देण्याचे आश्वासन; इंडिया आघाडीतील पक्षांच्या जाहीरनाम्यांचे विश्लेषण
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?