News Flash

केरळमध्ये जनावरांच्या विक्रीवरील बंदीचा निषेध, विधानसभेत नाश्त्यात बीफ फ्राय

आमदारांनी चमचमीत बीफ फ्रायवर मारला ताव

. केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा निषेध करणारा ठराव विधानसभेत मांडण्यात आला.

केरळ विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली असून केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा निषेध दर्शवण्यासाठी हे अधिवेशन भरले आहे. पण हे अधिवेशन वादळी ठरण्याची दाट शक्यता असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाश्त्यामध्ये बीफ फ्राय ठेवण्यात आले होते.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी आठवडी बाजारात दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घातले होते. या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी केरळ विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली. केंद्र सरकारचा अध्यादेश हा जनतेच्या विरोधात असून यामुळे मूलभूत हक्काचे उल्लंघन होते असे मत विधानसभेत मांडण्यात आले. केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा निषेध करणारा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. या ठरावाला मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यासह सर्व आमदारांनी पाठिंबा दिला. भाजप आमदार ओ. राजगोपाल यांनी मात्र या प्रस्तावाचा विरोध केला.

ठरावाचे समर्थन करताना मुख्यमंत्री विजयन म्हणाले, नवीन अध्यादेशाचा केरळमधील जनतेला फटका बसत आहे. सुमारे पाच लाख लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पशूंच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायाशी संबंधीत आहे. या अध्यादेशामुळे ते बेरोजगार झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पशूंची खरेदी विक्री आणि कत्तल खाने हे विषय राज्य सरकारच्या अखत्यारित येतात आणि यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही असे त्यांनी सुनावले. भाकड गायींच्या देखभालीसाठी शेतकऱ्याला आता ४० हजार रुपये खर्च करावे लागणार आहे. भारतात बहुसंख्य नागरिक हे मांसाहार करतात आणि नवीन नियम हे अन्यायकारक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विधानसभेच्या कँटीनमधील नाश्त्यामुळेही हे अधिवेशन वादात सापडले. विधानसभेच्या कँटीनमध्ये अधिवेशनाच्या काळात सकाळी ११ नंतर जेवणात बीफ मिळते. पण आज (गुरुवारी) बीफबंदीविरोधातच अधिवेशन असल्याने आम्ही तब्बल १० किलो बीफ मागवले होते. विशेष म्हणजे बहुसंख्य आमदारांनी नाश्त्यामध्ये बीफ फ्रायवर ताव मारला आणि मग ते विधानसभेत गेले असे कँटीनमधील कर्मचाऱ्याने सांगितले. मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे आमदार एस राजेंद्रन यांनी सर्वात अगोदर बीफ फ्राय मागितला असे त्या कर्मचाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2017 4:31 pm

Web Title: kerala assembly mla beef fry in breakfast resolution passed against centres ban on sale of cattle for slaughter
Next Stories
1 निमचमध्ये राहुल गांधींसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
2 Forbes top 100 paid athletes : सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप १०० खेळाडूंच्या यादीत टीम इंडियातील हा एकमेव खेळाडू…
3 ‘ते’ शेतकरी पोलीस गोळीबारातच मारले गेले; गृहमंत्र्यांची कबुली
Just Now!
X