केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून अद्याप कोणताही त्रास होत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिनरायी विजयन हे उथ्तर केरळमधील कन्नूर येथील आपल्या घरी आहेत. त्यांना कोझिकोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःच्या आरोग्याचे निरीक्षण करावे, अशी विनंती देखील मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केली आहे.

केरमळमध्ये मागील काही आठवड्यांपासून करोनाबाधितांची संख्या मोठ्याप्रमाणावर आढळून येत आहे. या अगोदर विजयन यांची मुलगी वीणा विजयन आणि जावई पी ए मोहम्मद रियास हे करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी विजयन यांनी राज्यभर फिरून प्रचार केला होता.