News Flash

हादियाचे वडील म्हणतात, माझ्या कुटुंबात दहशतवादी नको!

ती  पुन्हा शिक्षण घेणार याचा मला आनंदच आहे

इस्लाम धर्म स्वीकारुन स्वीकारुन मुस्लीम तरुणाशी विवाह करणाऱ्या केरळमधील हादिया या तरुणीला सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर हजर करण्यात आले.

केरळमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील हादिया या तरुणीच्या वडिलांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. मला माझ्या कुटुंबात दहशतवादी नको असे तिच्या वडिलांनी म्हटले असून हादियाची रवानगी होमिओपथी महाविद्यालयात करण्याच्या निर्णयाचेही तिच्या वडिलांनी स्वागत केले.

केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणातील हादिया या तरुणीला सुप्रीम कोर्टात सोमवारी हजर करण्यात आले. मला माझे स्वातंत्र्य परत हवे, मला पतीसमवेत राहायचे आहे, असे हादियाने सुप्रीम कोर्टात सांगितले होते. १०५ मिनिटे हादियाची बाजू ऐकून घेतल्यावर सुप्रीम कोर्टाने हादियाची रवानगी तामिळनाडूतील सालेम येथील होमिओपथी महाविद्यालयात करण्याचा निर्णय दिला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे हादियाचे पालक असतील, असे कोर्टाने स्पष्ट केले होते.

न्यायालयाच्या निकालावर मंगळवारी हादियाचे वडील केएम अशोकन यांनी प्रतिक्रिया दिली. हादियाला सीरियात जायचे आहे, पण तिथे काय परिस्थिती आहे याबाबत तिला काहीच माहित नाही. मला माझ्या कुटुंबात दहशतवादी नको, असे त्यांनी सांगितले. या सगळ्या वादात हादियाच्या शिक्षणात अडथळे आले. आता ती  पुन्हा शिक्षण घेणार याचा मला आनंदच आहे, असे त्यांनी नमूद केले. मी तिला कैदेत ठेवले नव्हते, तिच्या घराबाहेर पोलिसांचे पथक संरक्षणासाठी तैनात होते, असा दावा त्यांनी केला.

सालेममध्ये हादिया सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली आहे, त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे अशोकन यांनी म्हटले आहे. मला कोर्टाने परवानगी दिली तर मी तिची भेट घेण्यास तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. मंगळवारी कडेकोट बंदोबस्तात हादियाला सालेममधील महाविद्यालयात पाठवण्यात आले.

काय आहे प्रकरण?
केरळमध्ये राहणाऱ्या शफीन जहानने डिसेंबर महिन्यात एका हिंदू महिलेशी विवाह केला होता. हादिया असे त्या महिलेचे नाव असून धर्मांतर केल्यानंतर तिने शफीनशी विवाह केला होता. हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला होता. तर एनआयएनेही या प्रकरणात अहवाल दिला होता. केरळमध्ये एक यंत्रणा सुनियोजित पद्धतीने काम करत आहे, ती समाजाचे मतांतर करुन त्यांना कट्टर बनवण्याचे काम करत असून अशा प्रकारची ८९ प्रकरणे उघडकीस आल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले होते. केरळ हायकोर्टाने हा विवाह रद्द ठरवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 6:11 pm

Web Title: kerala conversion case dont want terrorist in family says hadiyas father welcomes supreme court decision
Next Stories
1 इव्हान्का ट्रम्प यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
2 ‘२०१० मधील ‘ती’ घटना विसरलात का?’; भाजपचा राहुल गांधींना सवाल
3 एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला महिलेने कानशिलात लगावली
Just Now!
X