02 March 2021

News Flash

पोलिसाने लाठी फेकून मारली, बाईकस्वार कारवर आदळून भीषण अपघात

दुचाकीस्वाराने गाडी थांबवली नाही म्हणून पोलीस अधिकाऱ्याने त्याला रोखण्यासाठी लाठी फेकून मारली.

दुचाकीस्वाराने गाडी थांबवली नाही म्हणून पोलीस अधिकाऱ्याने त्याला रोखण्यासाठी लाठी फेकून मारली. पोलिसाची लाठी लागून दुचाकीस्वाराचा बॅलन्स गेला व विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर जाऊन त्याची बाईक आदळली. या अपघातात सिद्दिकीच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. केरळच्या कोल्लममध्ये ही घटना घडली.

पोलीस अधिकारी चंद्रमोहन कोल्लममध्ये वाहनांची तपासणी करत असताना सिद्दिकी तिथून बाईकवरुन जात होता. चंद्रमोहन यांनी सिद्दिकीला बाईक थांबवायला सांगितली. पण तो पुढे गेला म्हणून चंद्रमोहन यांनी हातातली लाठी त्याच्या दिशेने फेकून मारली. त्यावेळी हा भीषण अपघात घडला. पोलीस माझ्या मुलाला तालुक्याच्या रुग्णालयात घेऊन गेले व तिथेच सोडून निघून गेले.

रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी मला या अपघाताची माहिती दिली असे सिद्दिकीच्या वडिलांनी सांगितले. या घटनेनंतर स्थानिकांनी आंदोलन केले. वाहतूक रोखून धरली व संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात कारवाईची मागणी केली. सिद्दिकीवर लाठी फेकून मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश केरळचे डीजीपी लोकनाथ बेहरा यांनी दिले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांना मी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत असे डीजीपींनी सांगितले. चंद्रमोहन यांचे निलंबन करण्यात आले असून त्यावेळी तिथे तपासणी करणाऱ्या अन्य दोन पोलिसांची बदली करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 4:47 pm

Web Title: kerala cop hurls lathi at biker victim collides with car dmp 82
Next Stories
1 श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्ष यांनी भारतात केली ‘ही’ महत्वपूर्ण घोषणा
2 धक्कादायक! वाढदिवसाच्या दिवशीच प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार करुन केली हत्या
3 ‘त्या’ वक्तव्यामुळे भाजपानेच वाढवली संजय राऊतांची सुरक्षा
Just Now!
X