News Flash

केरळमधील पहिल्या तृतीयपंथी RJ चा मृतदेह सापडल्याने खळबळ; थेट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

निवडणुकीच्या रिंगणात उतरणारीदेखील ती पहिलीच तृतीयपंथी उमेदवार होती

निवडणुकीच्या रिंगणात उतरणारीदेखील ती पहिलीच तृतीयपंथी उमेदवार होती

केरळमधील पहिली तृतीयपंथी रेडिओ जॉकी म्हणून ओळख मिळवलेल्या अनन्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. अनन्याने विधानसभा निवडणूकदेखील लढली होती. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारीदेखील ती पहिलीच तृतीयपंथी उमेदवार होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेडरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत अनन्याचा मृतदेह आढळून आला.

याआधी २८ वर्षीय अनन्याने लिंगबदल शस्रक्रियेनंतर आपली प्रकृती ठीक नसल्याची माहिती दिली होती. सर्जरीनंतर आपण बराच वेळ एका ठिकाणी उभं राहू शकत नाही तसंच काम करु शकत नसल्याचं तिने म्हटलं होतं. सर्जरीमध्ये झालेल्या काही चुकांमुळे आपल्याला आरोग्याशी संबंधित अडचणी जाणवत असल्याची माहिती तिने दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यासंबंधी तक्रारींमुळे मृत्यू झाल्याची शंका आहे. सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे. दरम्यान अनन्याच्या मित्रांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे.

अनन्या कुमारी अॅलेक्स विधानसभा निवडणूक लढवणारी पहिली तृतीयपंथी होती. मात्र नंतर तिने डीएसजेपी पक्षाकडून मानसिक त्रास दिला जात असून हत्येच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत उमेदवारी मागे घेतली होती. अनन्या रेडिओ जॉकीसोबतच मेकअप आर्टिस्ट आणि एका खासगी न्यूज चॅनेलमध्ये अँकरही होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 10:01 am

Web Title: kerala first transgender rj and assembly poll candidate anannyah kumari alex found dead sgy 87
Next Stories
1 भाजपा पदाधिकाऱ्यांनीच केला दहशतवादी हल्ल्याचा बनाव, कारण…; पोलीस तपासात बिंग फुटले
2 मॉडिफाइड सायलेन्सर्स असणाऱ्या बाईक्सवर कारवाईचे उच्च न्यायालयाचे आदेश; म्हणाले, “या बाईक्स…”
3 पाळत प्रकरणाचे संसदेत तीव्र पडसाद
Just Now!
X