News Flash

सोने तस्करीप्रकरणी केरळच्या उच्च शिक्षणमंत्र्यांची चौकशी

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

संग्रहित छायाचित्र

 

केरळमधील सोने तस्करीप्रकरण आणि दहशतवाद यांच्यातील संबंधांची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) राज्याचे उच्च शिक्षणमंत्री के. टी. जलील यांची गुरुवारी कसून चौकशी केली.

एफसीआरए निकषांचे उल्लंघन करून राजनैतिक मार्गाने संयुक्त अरब अमिरातीमधून आलेल्या पवित्र कुराणाच्या प्रती स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

जलील गुरुवारी सकाळी सहा वाजता एनआयए कार्यालयात एका खासगी मोटारीने पोहोचले. गेल्या आठवडय़ात त्यांची सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणी चौकशी केली होती. माध्यमांच्या प्रतिनिधींना टाळण्यासाठी ते लवकर कार्यालयात पोहोचले, मात्र मल्याळी दूरचित्रवाणीच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठले.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सोने तस्करीप्रकरणी केरळचे मंत्री जलील यांची एनआयएने चौकशी केल्यानंतर काँग्रेस आणि भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आणि मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या राजीनाम्याची मागणी केली.राज्य सरकारने राजीनामा द्यावा आणि निवडणुकांना सामोरे जावे, असे केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला म्हणाले. वास्तविक पाहता विजयन यांनी जलील यांचा राजीनामा घेतला पाहिजे परंतु ते तसे करीत नाहीत कारण त्यांना तपास आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचेल अशी धास्ती आहे, असेही चेन्नीथला म्हणाले. दरम्यान, जलील यांच्या दूरध्वनीचा तपशील पाहिल्यास ते सातत्याने सोने तस्करी प्रकरणातील आरोपीच्या संपर्कात होते हे स्पष्ट होते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:26 am

Web Title: kerala higher education minister inquired into gold smuggling case abn 97
Next Stories
1 ‘इनहेलर’च्या माध्यमातून लस देण्याचा पर्याय
2 माजी मंत्री अरुण शौरी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश
3 चीनकडूनच करारांचे उल्लंघन
Just Now!
X