News Flash

आयसिसच्या केरळ मॉड्यूलचा म्होरक्या अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात ठार

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा केरळ मॉड्यूलचा म्होरक्या राशीद अब्दुल्ला महिन्याभरापूर्वी अफगाणिस्तानात ठार झाल्याची माहिती आहे.

(संग्रहित छायाचित्र)

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा केरळ मॉड्यूलचा म्होरक्या राशीद अब्दुल्ला महिन्याभरापूर्वी अफगाणिस्तानात ठार झाल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानच्या खोरासन प्रांतातून आयसिसच्या एका अज्ञात दहशतवाद्याने टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून पाठवलेल्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकन सैन्याच्या बॉम्ब हल्ल्यात राशीद अब्दुल्लाचा खात्मा झाला. तीन भारतीय पुरुष, दोन महिला आणि चार लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे या दहशतवाद्याने संदेशात म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आयसिसच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी राशीद अब्दुल्ला सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर सक्रिय होता. केरळच्या कासारागॉड जिल्ह्यात रहाणाऱ्या राशीद अब्दुल्लाच्या टेलिग्राम अकाऊंट मागच्या दोन महिन्यांपासून अपडेट नव्हते. त्यामुळे त्याचे काय झाले याची विचारणा करण्यासाठी संदेश पाठवला. त्यावर तो आता जिवंत नसल्याचे उत्तर मिळाले. ही माहिती देणाऱ्या इसिसच्या दहशतवाद्याने स्वत:ची ओळख सांगितलेली नाही.

केरळमधून मे ते जून २०१६ दरम्यान २१ जण इसिसमध्ये सहभागी झाले होते. अफगाणिस्तानातील आयसिसचे वर्चस्व असलेल्या भागात हे सर्वजण गेले होते. राशीद अब्दुल्ला या २१ जणांचा नेता होता. अब्दुल्ला सोबत त्याची पत्नी आयेशा सुद्धा गेली होती. भारतातून यूएई तिथून तेहरानमार्गे हे सर्वजण अफगाणिस्तानात पोहोचले होते. पीस इंटरनॅशनल शाळेचा कर्मचारी असणारा अब्दुल्ला २०१४ साली इसिसच्या विचारधारेकडे आकर्षित झाला.

अब्दुल्ला इंजिनिअर होता. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या इसिसच्या प्रचाराच्या साहित्याने तो प्रभावित झाला असे त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी सांगितले. अफगाणिस्तानात गेल्यानंतर केरळमधील तरुणाईला आयसिसकडे ओढण्यासाठी तिथून तो ऑडिओ क्लिप्स पाठवायचा. टेलिग्राम अॅपवरील विविध अकाऊंटसवरुन त्याने ९० पेक्षा जास्त ऑडिओ क्लिप्स पाठवल्या होत्या. शाजीर अब्दुल्ला ठार झाल्यानंतर तो केरळ मॉड्यूलचे नेता बनला होता. शाजीर अब्दुल्ला सुद्धा केरळच्या कोझीकोडेमधील इंजिनअरींगचा पदवीधर होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 9:36 am

Web Title: kerala is module leader rashid abdulla killed in afghanistan us forces
Next Stories
1 जवानांनी एका दहशतवाद्याला घातले कंठस्नान, काश्मीरच्या शोपियनमध्ये चकमक
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सियाचेनमध्ये
Just Now!
X