केरळमध्ये मुसळधार पावासने धुमाकूळ घातला असून इडुक्की, पलक्कड या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या सतत वाढत जाणाऱ्या पातळीमुळे इडुक्कीमधील चीरुथोनी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. वायनाड, मालाप्पूरम आणि इडुक्कीमध्ये काही ठिकाणी दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत.

 

उच्चस्तरीय बैठकी झालेल्या निर्णयानुसार चीरुथोनी धरणातून प्रतिसेकंद ३ लाख लिटर पाणी सोडण्यात येणार आहे. एर्नाकुलम जिल्ह्यात ५७ मदत छावण्यात उभारण्यात आल्या असून तिथे १०७६ कुटुंबाना हलवण्यात आले आहे. केरळमध्ये पावसामुळे तिसरा रेड अलर्ट जारी झाला असून लष्कर, नौदल आणि एअर फोर्सला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

५० वर्षात प्रथमच केरळमध्ये असा धुवाधार पाऊस कोसळत आहे असे केंद्रीय मंत्री के.जे.अल्फोन्स यांनी सांगितले. एनडीआरएफच्या दहा टीम्स मदतकार्यात गुंतल्या आहेत.