News Flash

पीडितेला म्हटले वेश्या , नन बलात्कार प्रकरणी आमदाराचं लाजिरवाणं विधान

१२ वेळेस तिने मजा घेतली आणि १३ व्यांदा हा बलात्कार कसा झाला? जेव्हा पहिल्यांदा बलात्कार झाला होता, तेव्हाच तिने तक्रार का केली नाही?'

(अपक्ष आमदार -पी. सी. जॉर्ज )

जालंधर प्रांताचे बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ननबाबत एका आमदाराने वादग्रस्त व लाजिरवाणं विधान केलं आहे. पीडितेने केलेल्या बलात्काराच्या आरोपांवर शंका उपस्थित करताना केरळमधील अपक्ष आमदार पी. सी. जॉर्ज यांनी त्या पीडितेलाच वेश्या असं म्हटलंय.

जून महिन्यात एका ननने बिशप मुलक्कल यांच्यावर आरोप करताना, केरळजवळील कोट्टायम येथील एका कॉन्व्हेंटमध्ये २०१४ ते २०१६ दरम्यान वारंवार बलात्कार केल्याचं म्हटलं होतं. याबाबत बोलताना आमदार पी. सी. जॉर्ज म्हणाले, ‘ती नन वेश्या आहे यामध्ये कोणालाही शंका नाहीये. १२ वेळेस तिने मजा घेतली आणि १३ व्यांदा हा बलात्कार कसा झाला? जेव्हा पहिल्यांदा बलात्कार झाला होता, तेव्हाच तिने तक्रार का केली नाही?’


पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीवर कारवाई केली जावी यासाठी तिच्या सहकारी असलेल्या पाच नन आणि अन्य संघटनांनी केरळ उच्च न्यायालयासमोर शनिवारी धरणे धरले होते. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजकीय ताकदीचा वापर करुन आरोपी बिशप फ्रँको मुलक्कल यांना वाचवलं जात आहे, पण आमची बाजू मांडायला कोणीही नाही असा आरोप त्यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 10:51 am

Web Title: kerala mla pc george says nun is a prostitute
Next Stories
1 BLOG: वर्षभरातील बंदचं एखादं वेळापत्रकच बनवा ना…
2 पॅरिसमध्ये चाकूहल्ला , 7 जण जखमी ; अफगाणिस्तानच्या नागरिकाला अटक
3 बंदमध्ये सहभागी न होण्यासाठी उद्धव ठाकरेंना अमित शाह यांच्याकडून विनवणी
Just Now!
X