26 February 2021

News Flash

केरळमध्ये मशिदीत पार पडला हिंदू विवाह, मुस्लीम समाजाने लावून दिलं लग्न; १० तोळं सोनं दिलं भेट

केरळमध्ये जातीय सलोख्याचं एक अनोखं उदाहरण पहायला मिळालं आहे

केरळमध्ये जातीय सलोख्याचं एक अनोखं उदाहरण पहायला मिळालं आहे. अलपुझा जिल्ह्यामधील कायमकुलम येथील मुस्लीम समाजाने हिंदू तरुणीचं लग्न लावून देत एकतेचा संदेश दिला. इतकंच नाही तर हे लग्न १०० वर्ष जुन्या चेरावल्ली जमात मशिदीत लावण्यात आलं. अगदी हिंदू धर्माच्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. हे लग्न सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

विवाह झालेल्या तरुणीचं नाव अंजू आहे. अंजूच्या वडिलांचा दोन वर्षापूर्वी ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता. आई बिंदू यांच्यासमोर मुलीचं लग्न कसं करायचं याची चिंता लागली होती. पतीच्या निधनानंतर असहाय्य झालेल्या बिंदू आपल्या तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात राहतात. त्यांनी मशिदीच्या व्यवस्थानकडे यासाठी मदत मागितली. यावर त्यांनी तात्काळ मदतीसाठी तयारी दर्शवली.

लग्नासाठी १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांचा मुहूर्त काढण्यात आला. मशिदीच्या वतीने पत्रिका छापून वाटण्यात आल्या. विशेष म्हणजे मशिदीकडून पाहुण्यांच्या जेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. यासोबत नवदांपत्याला दहा तोळे सोने आणि दोन लाख रुपये भेट म्हणून देण्यात आले.

मशिदीचे सचिव नुजुमुद्दीन अलुम्मूट्टील यांनी सांगितल्यानुसार, मशीद समितीने मुलीला सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. हे पूर्ण लग्न हिंदू पद्धतीने पार पडलं. या लग्नासाठी एक हजार पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. बिंदू यांनी आपल्या मुलीचं इतक्या थाटामाटात लग्न लावून दिल्याबद्दल मशीद समितीचे आभार मानले आहेत.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या लग्नाचे फोटो ट्विट करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 8:39 am

Web Title: kerala mosque cheruvally muslim jamaat mosque hindu couple wedding sgy 87
Next Stories
1 व्हॉट्सअप झाले ठप्प; काही काळासाठी जगभरातील युजर्स गोंधळात
2 मजा येत नाही ! तीन Porn Sites विरोधात कर्णबधिर व्यक्तीचा खटला, भेदभाव केल्याचा आरोप
3 या मुस्लीम देशाच्या नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो!
Just Now!
X