27 February 2021

News Flash

केरळमध्ये करोनाची दुसरी लाट? आठवडयाभरात ३०० पेक्षा जास्त रुग्ण

...म्हणून केरळमध्ये वाढले करोना रुग्ण

केरळमध्ये पुन्हा एकदा करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मागच्या एका आठवडयात केरळमध्ये ३०० पेक्षा जास्त जणांना करोनाची लागण झाली आहे.  केरळमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा वेगाने करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या महिन्याच्या मध्यापर्यंत केरळमध्ये परिस्थिती नियंत्रणात होती. पण आता केरळमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. देशातंर्गत प्रवास आणि परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे केरळमध्ये पुन्हा एकदा करोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे.

मागच्या एका आठवडयात केरळमध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या ६६६ वरुन १००३ पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा वेग १२ दिवसांपेक्षा कमी आहे. राष्ट्रीय स्तरावर करोना रुग्णांची संख्या दुप्प्ट होण्याचे प्रमाण १४ दिवस आहे.

मे च्या मध्यापर्यंत केरळमध्ये रुग्ण संख्या दुप्पट होण्याचे प्रमाणे १०० पेक्षा जास्त दिवस होते. मागच्या काही दिवसात केरळमध्ये एकाही करोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. करोनाची लागण झालेले ९० टक्केपेक्षा जास्त रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले होते. केरळमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत मृत्यूदरही प्रचंड कमी आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर निर्बंध शिथील झाले. अनेकांना त्यांच्या राज्यात परतण्याची मुभा दिली त्यानंतर केरळमध्ये पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 8:23 pm

Web Title: kerala now growing faster than national average dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नवीन मोबाईल घेण्यावरुन पतीशी भांडण, विवाहितेची आत्महत्या
2 ड्रॅगनची दुहेरी खेळी, बाहेर नरमाईचे संकेत पण सीमेवर सैनिक संख्या कायम
3 कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली
Just Now!
X