24 October 2020

News Flash

केरळने निष्काळजीपणाची किंमत मोजली -हर्षवर्धन

ओनम उत्सवापूर्वी केरळमध्ये केवळ ५४ हजार जणांनाच करोनाची लागण झाली

| October 19, 2020 12:28 am

नवी दिल्ली : केरळमध्ये ओनमच्या सणासाठी काही सेवांवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आणि व्यापार व पर्यटनासाठीच्या प्रवासात वाढ झाली. त्यामुळे कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढला आणि केरळला निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी येथे सांगितले.

उत्सवाच्या मोसमासाठी नियोजन करताना जी राज्ये निष्काळजीपणा दाखवितात त्यांनी यापासून चांगला धडा घेतला पाहिजे, असे हर्षवर्धन म्हणाले. केरळमधील करोनाबाधितांच्या संख्येने ३.३ लाखांचा टप्पा ओलांडला तर करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या शनिवारी ११३९ इतकी झाली. ओनम उत्सवापूर्वी केरळमध्ये केवळ ५४ हजार जणांनाच करोनाची लागण झाली होती तर जवळपास २०० जणांचा मृत्यू झाला होता.

‘रविवार संवाद’ या कार्यक्रमाच्या सहाव्या भागात बोलताना हर्षवर्धन यांनी  पारंपरिक पद्धतीने आपापल्या घरातच उत्सव साजरे करण्याची विनंती केली. देशात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा नाही, गरज भासल्यास उत्पादन क्षमतेत वाढ केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

समूह संसर्ग काही जिल्ह्य़ांमध्येच, देशभरात नाही

देशातील काही राज्यांमधील जिल्ह्य़ांमध्येच करोनाचा समूह संसर्ग होत आहे, हा प्रकार देशभरात होत नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी येथे स्पष्ट केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, राज्यात समूह संसर्ग झाल्याचे म्हटले होते, त्याकडे रविवार संवाद कार्यक्रमात  हर्षवर्धन यांनी ही बाब स्पष्ट केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 12:28 am

Web Title: kerala paying price for gross negligence says harsh vardhan zws 70
Next Stories
1 हाथरस घटनेच्या निषेधार्थ २६ ऑक्टोबरला काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन
2 मग्रूर नेत्याला धडा शिकवण्याची वेळ आली, ज्योतिरादित्य शिंदेंचा कमलनाथांवर निशाणा
3 पीडित कुटुंबांचा आवाज दाबला जात आहे, हा कोणता राजधर्म आहे? – सोनिया गांधी
Just Now!
X