News Flash

परीक्षा देणारे विद्यार्थी निघाले करोना पॉझिटिव्ह; ६०० पालकांविरोधात गुन्हा दाखल

परीक्षांवर करोनाचे संकट

(संग्रहित छायाचित्र)

देशातील करोना संकटाची तीव्रता अजूनही कमी झालेली नाही. दिवसेंदिवस देशातील रुग्णांची संख्या वाढत असून, प्रत्येक दिवसांला उच्चांकी रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे देशातील शैक्षणिक वेळापत्रक कोलमडून पडलं आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तर विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, केरळमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत काही विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. तर सोशल डिस्टन्सिग नियमांचा भंग केल्याप्रकरणी ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

केरळमध्ये अभियांत्रिकी, वास्तुस्थापत्य (आर्किटेक्चर), वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला उपस्थित असलेला एक १७ वर्षीय विद्यार्थी बुधवारी करोना पॉझिटिव्ह निघाला. तर मंगळवारीही (२१ जुलै) दोन विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह निघाले होते. दरम्यान, केरळ पोलिसांनी परीक्षेला बसलेल्या ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांविरोधात सोशल डिस्टन्सिगच्या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन अनेक राज्यांनी शैक्षणिक वर्षही उशिरानं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये करोनामुळे परिस्थिती चिंताजनक असल्यानं राज्य सरकारनं ऑनलाईन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास सुरूवात केली आहे. तर विद्यापिठीय परीक्षांचा निर्णय अजूनही निश्चित झालेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगानं याविषयी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्या तरी राज्य सरकार मात्र, परीक्षा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 6:30 pm

Web Title: kerala police booked over 600 parents of students who appeared for entrance exam bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गलवानमध्ये शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांची पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी
2 भूमिपूजनाचं ठरलं; पाच ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटन, सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
3 “७२ तासांमध्ये दूतावास बंद करुन चालते व्हा”; अमेरिकेचे चीनला फर्मान
Just Now!
X