देशात करोना संशयित पहिल्यांदा आढळला तो केरळ राज्यात. त्यानंतर इतर ठिकाणीही त्याचा प्रादुर्भाव जाणवू लागला. आता देशभरात करोनाची लागण झालेल्यांची संख्या १४८ च्या आसपास आहे. याच केरळमधून आता करोनापासून वाचवण्याचे भन्नाट उपाय पुढे आणले जात आहेत. केरळच्या पोलिसांचा असाच एक व्हिडिओ तयार केला आहे आणि तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

भारतात सध्या करोना व्हायरस हा दुसऱ्या स्टेजवर आहे. करोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या देशाभरात १४८ झाली आहे. केंद्र सरकार तसंच राज्य सरकारकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. तसेच देशातील करोना व्हायरस हा स्टेज ३ पर्यंत न जाण्यासाठी सरकारतर्फे तसेच लोकांकडूनही सोशल मीडियावर जनजागृती करण्यात येत आहे.

काय आहे पोलिसांच्या या  व्हिडिओमध्ये?

केरळ पोलिसांनीही नाचण्यातून हात धुण्याचा काही स्टेप्स करून दाखवल्या आहेत. केरळ पोलिसांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

केरळ पोलिसांच्या मिडिया सेंटरने हा व्हिडिओ सोशलमिडियावर पोस्ट केला आहे. घाबरण्याची काही गरज नाही. सावधानता बाळगण्याची गरज आहे. चला एकत्र एक काम करूया केरळ पोलिस तुमच्या सोबत आहे. अशा कॅप्शनसोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे. ८ लाखांपेक्षाही जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.