News Flash

राजकीय मैदानात श्रीशांतचा पराभव

शिवकुमार यांनी श्रीशांतचा ११,७१० मतांनी पराभव केला

एस. श्रीशांत (संग्रहित छायाचित्र)

क्रिकेटच्या मैदानात वादग्रस्त राहिलेला भारतीय संघाचा माजी गोलंदाज श्रीशांत राजकारणाच्या मैदानात अपयशी ठरला आहे. भाजपच्या तिकीटावर केरळ विधानसभेत लढणाऱया श्रीशांतला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेस नेते व विद्यमान आरोग्यमंत्री व्ही.एस.शिवकुमार यांनी श्रीशांतला राजकारणाच्या पिचवर ‘क्लिन बोल्ड’ केले आहे. इतकेच नाही तर श्रीशांत त्याच्या मतदार संघात तिसऱया स्थानावर फेकला गेला आहे.

भाजपने तिरुवअनंतपुरम मतदारसंघातून श्रीशांतला विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले होते. श्रीशांतलाही आपल्या विजयाची खात्री होती. मात्र, काँग्रेसच्या व्ही.एस.शिवकुमार यांनी श्रीशांतचा अपेक्षाभंग केला. शिवकुमार यांनी श्रीशांतचा ११,७१० मतांनी पराभव केला. श्रीशांतला ३४,७६४ मतं मिळाली, तर शिवकुमार यांना ४६,४७४ मते मिळाली. दुसऱया क्रमांकावरील अपक्ष उमेदवार अॅड.अँथनी राजू यांना ३५,५६९ मते मिळवली.

केरळमध्ये सत्ताधारी काँग्रेसला डाव्यांचा धक्का

क्रिकेटची वाट सोडून श्रीशांतने निवडणुकीच्या तोंड्यावर मोठ्या थाटात भाजपमध्ये प्रवेश केला. श्रीशांतच्या सहभागामुळे केरळमध्ये पक्षाला चांगेल यश मिळेल असा विश्वास भाजपने व्यक्त केला होता. तर भाजपला केरळमध्ये ३५ ते ४० जागा मिळतील असा अंदाज श्रीशांत याने व्यक्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2016 2:19 pm

Web Title: kerala poll googly stumps sreesanth ex cricketer trails in thiruvananthapuram
टॅग : Sreesanth
Next Stories
1 राजकारणात पराभव आणि विजय निरंतर चालणारी प्रक्रिया – काँग्रेस
2 पश्चिम बंगाल भ्रष्टाचार मुक्त राज्य असल्याचा गर्व- ममता बॅनर्जी
3 ANALYSIS BLOG : तमिळनाडूच्या राजकारणाने कूस बदलली
Just Now!
X