19 January 2021

News Flash

केरळला पावसाने झोडपले, २२ जणांचा मृत्यू

राज्यात पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या सहा तर सैन्याच्या तीन तुकड्या केरळमध्ये पोहोचल्या आहेत.

Kerala rains: एनडीआरएफच्या सहा तुकडा केरळमध्ये पोहोचल्या आहेत.

केरळला मुसळधार पावसाने झोडपले असून गेल्या २४ तासांमध्ये राज्यात पावसामुळे एकूण २२ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात एनडीआरएफचे पथक पाठवण्यात आले आहे. गुरुवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. आपातकालीन समयी केंद्र सरकारकडून केरळला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मोदींनी दिले. तर कर्नाटकनेही केरळला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

केरळला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला असून राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये २२ जण मृत्यमुमुखी पडले आहेत. यातील ११ जण इडुक्कीत दरड कोसळल्याने ठार झाले. इडुक्कीच्या अडिमाली शहरात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर मलप्पुरममध्ये सहा, कन्नूरमध्ये दोन आणि वायनाड जिल्ह्यात एक जण ठार झाला आहे.

राज्यातील पूरस्थिती गंभीर आहे, राज्याच्या इतिहासामध्ये प्रथमच एकाच वेळी २२ धरणांचे दरवाजे उघडावे लागले, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिली. एनडीआरएफच्या सहा तुकड्या केरळमध्ये पोहोचल्या आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. सैन्याच्याही तीन तुकड्या मदतीसाठी केरळमध्ये पोहोचल्या आहेत.

अतिवृष्टीचा परिणाम केरळमधील विमानसेवेवरही झाला असून पूरस्थिती पाहता अमेरिकेनेही भारतात पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. केरळमध्ये फिरणे टाळावे, असे यात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 2:29 am

Web Title: kerala rains flood updates death toll touches 22 idukki dam periyar river ernakulum alappuzha
टॅग Flood
Next Stories
1 काँग्रेसला हादरा! ‘महाआघाडी’त सामील होणार नाही: केजरीवाल
2 संपूर्ण भारतात सरासरीच्या दहा टक्के कमी पाऊस
3 अमेरिका रशियावरही नव्याने निर्बंध लादणार
Just Now!
X