कोची : केरळच्या इडुक्की जिल्ह्य़ात एका चहाच्या मळ्यातील घरांवर प्रचंड दरड कोसळून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणखी १७ जणांचे मृतदेह रविवारी ढिगाऱ्याखालून काढण्यात आल्यामुळे मृतांची संख्या ४३ वर गेली आहे. पेट्टामुडी येथे झालेल्या भीषण भूस्खलनात ही घरे वाहून गेल्यानंतर ३ दिवसांनी, अद्याप ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांच्या शोधासाठी कुत्र्यांची मदत घेण्याचे प्रशासनाने ठरवले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ही दुर्घटना घडली तेव्हा ७८ लोक त्या ठिकाणी राहात होते. १२ जणांची सुटका करण्यात आली, तर २८ मृतदेह हाती लागले आहेत. पेट्टीमुडी येथील निसर्गरम्य भूप्रदेश आता खडी व चिखल यांच्या स्वरूपात सपाट झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 3:44 am