केरळमध्ये करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. केरळमधील करोनाचा हा पहिलाच बळी आहे. एर्नाकुलम येथील मेडिकल कॉलेजमध्ये या ६९ वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात १४९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

केरळमध्ये करोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती ही दुबईहून परतली होती. या व्यक्तीवर एर्नाकुलम येथील कलामसरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु होते. २२ मार्च रोजी या व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणं आढळून आली होती. त्यानंतर त्याची चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. ही व्यक्ती कोची येथील रहिवासी होती.

या मृत व्यक्तीला आधीपासूनच हृदयरोग आणि रक्तदाबाचा त्रास होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर या व्यक्तीला व्हेंडिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. यापूर्वी या व्यक्तीची बायपास शस्त्रक्रियाही झाली होती, अशी माहिती या व्यक्तीच्या मेडिकल स्टेटमेंटमध्ये देण्यात आली आहे.