News Flash

CPI(M) कार्यालयात महिलेवर बलात्कार, विद्यार्थी कार्यकर्त्यावर आरोप

एका २१ वर्षीय महिलेने सीपीआय(एम)च्या स्थानिक कार्यालयात तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

एका २१ वर्षीय महिलेने सीपीआय(एम)च्या स्थानिक कार्यालयात तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. केरळच्या चेरपुलेसरी येथील सीपीआय(एम)च्या कार्यालयात ही घटना घडली आहे. पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. केरळमध्ये सीपीआय(एम)ची सत्ता आहे. न्यूज १८ ने वृत्त दिले आहे.

मागच्या शनिवारी पोलिसांनी रस्त्यावर एक नवजात अर्भक सापडले होते. पोलिसांनी या मुलीच्या आईला शोधून काढले. त्यावेळी दहा महिन्यांपूर्वी सीपीआय(एम)च्या कार्यालयात विद्यार्थी कार्यकर्त्याने केलेल्या बलात्कारातून आपण गर्भवती राहिल्याचा आरोप महिलेने केला. कॉलेजच्या मॅगझिनची तयारी करण्यासाठी आपण पक्षाच्या कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी ही घटना घडली असा दावा महिलेने केला आहे.

पीडित महिला एसएफआयची कार्यकर्ता असून तिचे कुटुंबही पक्षामध्ये सक्रिय आहे असे स्थानिक सीपीआय(एम) नेत्याने सांगितले. पक्ष कार्यालयात अशी घटना घडली असेल तर त्याची चौकशी करु. पोलिसांनीही सत्य शोधून काढावे असे या सीपीआय(एम) नेत्याने म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीची जबानी अजून नोंदवून घेतलेली नाही. सीपीआय(एम) चे पक्ष कार्यालय बलात्काराचे केंद्र बनले आहे. मला हे खेदाने म्हणावे लागतेय पण हे सत्य आहे अशी टीका काँग्रेस नेते रमेश चीन्नीथाला यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 3:23 pm

Web Title: kerala woman alleges rape by student activist inside cpms local office
Next Stories
1 सात वर्षांच्या मुलीला तंबाखू आणायला सांगितले, नंतर निर्जनस्थळी नेऊन केला बलात्कार
2 मद्यपी पतीची पत्नीने केली हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन घरातच पुरले
3 सामना सुरु असताना २२ वर्षीय क्रिकेटपटूचा मैदानात मृत्यू
Just Now!
X