भारतीयांचा नेहमीच नासाडी टाळण्याचा प्रयत्न असतो. कुठलीही गोष्ट वाया जाऊ नये याकडे भारतीय जास्त लक्ष देतात. अगदी अन्नापासून ते कागदाच्या तुकडयापर्यंत प्रत्येक गोष्ट उपयोगात आणण्याकडे कल असतो. एखाद्या वहीची काही कोरी पानं शिल्लक राहिली असतील तर फोन नंबर लिहिण्यासाठी त्या पानांचा उपयोग केला जातो.
पण केरळमध्ये तर एका महिलेने चक्क हद्दच केली. तिने चक्क नवऱ्याच्या पासपोर्टला फोन नंबरची डायरी बनवून टाकले. या पासपोर्टवरील कोऱ्या पानांवर तिने वेगवेगळे फोन नंबर लिहून ठेवले. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पासपोर्ट हे अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे. आपली परदेशवारी या पासपोर्टवरच अवलंबून असते. फिरण्यासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. अन्यथा तुम्ही देशाबाहेर जाऊ शकत नाही. या महिलेने नवऱ्याच्या पासपोर्टला फोन डायरेक्टरी बनवून टाकले. या पासपोर्टच्या शेवटच्या काही पानावर किराणा मालाची यादी आणि किती बिल झालं तो हिशोब सुद्धा लिहून ठेवला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 28, 2019 9:40 pm