News Flash

सचिनच्या करोना पॉझिटिव्ह ट्वीटनंतर पीटरसनने केला सवाल, त्यावर युवराजने त्याला विचारले…

सचिन तेंडुलकरने आपण करोना पॉझिटिव्ह असल्याचे ट्विटरवरुन सांगितले होते

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केवीन पीटरसन याने शनिवारी एक ट्वीट केले आणि लोक आपली कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्याची घोषणा का करतात, असा प्रश्न विचारला. सचिन तेंडुलकरने आपली कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्याची घोषणा केल्याच्या काही तासांनंतरच पीटरसन हे वक्तव्य केले. त्याच्या या चर्चेमध्ये भारतीय संघाचा माजी अष्टपैलु खेळाडू युवराज सिंगही सामील झला.

“मला कोविड – १९ हा रोग झाला आहे असे एखादी व्यक्ती संपूर्ण जगासमोर का जाहीर करत असेल, कृपया मला कोणी हे सांगू शकेल का?!” पीटरसनने असे ट्विटरवर लिहिले आहे. युवराजने लगेचच त्याला उत्तर दिले की, “आणि तुला हे आजच का सुचले, यापूर्वी तू असा विचार का नाही केलास?”

पीटरसनने नंतर स्पष्टीकरण दिले की, सचिन तेंडुलकरची कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्याची त्याला कल्पना नव्हती. सचिनच्या घोषणेच्या काही तासांनंतरच पीटरसन याने केलेल्या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले. हा प्रश्न केवळ कुतूहलाच्या निमित्ताने विचारला होता आणि त्यामागे कोणाच्याही भावना दुखवण्याचा त्याचा हेतू नव्हता असे त्याने नमूद केले.

“हा एक साधा, सोपा आणि निरुपद्रवी प्रश्न होता, अनेक लोक सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर आपल्याला कोविड असल्याची घोषणा का करतात. कारण ज्या लोकांना हे माहित आहे की ते त्या व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत आणि आता त्यांनीसुद्धा चाचणी करणे आवश्यक आहे, यावरून हा अर्थ प्राप्त होतो! धन्यवाद! ” पीटरसन याने असे ट्विट केले आहे.

सचिन तेंडुलकर करोना पॉझिटिव्ह

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला करोनाची लागण झाली आहे. सचिननेच यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली आहे. आपण होम क्वारंटाइन असून डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत आहे असं देखील सचिनने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 6:26 pm

Web Title: kevin pietersen raises eyebrows with his tweet about covid positive later yuvraj singh reacts sbi 84
Next Stories
1 Ind vs Eng : आदिल राशिदने नवव्यांदा केली विराटची ‘शिकार’, कोहलीविरुद्ध सर्वात यशस्वी बॉलर कोण?
2 हार्दिक पांड्याला गोलंदाजी न देण्याचं विराट कोहलीचं कारण ऐकून सेहवाग भडकला; म्हणाला….
3 “मला फोन करा, मी तुम्हाला….,” सुनील गावसकर यांच्या टीकेला जॉनी बेअरस्टोने दिलं उत्तर
Just Now!
X